31 C
Mumbai
Saturday, October 1, 2022
घरराजकारणलाज वाटते का, यावरून मुनगंटीवारांनी आदित्य ठाकरेंना झापले

लाज वाटते का, यावरून मुनगंटीवारांनी आदित्य ठाकरेंना झापले

Related

पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस राज्यातील कुपाेषणाच्या मुद्यावरून गाजला. विधानसभेत कुपाेषणावर सुरू असलेल्या चर्चेत कृषीमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरावर आदित्य ठाकरे यांनी असंसदीय शब्दाचा वापर केला. या शब्दावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी जाेरदार आक्षेप घेतला. आपण आपल्या पिताश्रींना लाज वाटते का, विचारता? असा प्रश्न वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आदित्य ठाकरे यांना केला. हा असंसदीय शब्द मागे घ्यावा असं मुनगंटीवार म्हणाले. त्यानंतर सत्ताधारी आणि विराेधक यांच्यात खडाजंगी झाली.

विधानसभेत सदस्य कुणाल पाटील यांनी राज्यातील कुपाेषणाच्या विषयावर तारांकित प्रश्न उपस्थित केला हाेता. प्रश्नाेत्तराच्या तासात त्यावरील चर्चेमध्ये त्याला उत्तर देताना आदिवासी मंत्री विजयकुमार गावीत यांनी राज्यात कुपोषणामुळे एकही बालक मृत्यूमुखी पडलेले नाही. इतर आजारांनी बालक मृत्यू पडल्याचं सांगितलं. आदित्य ठाकरे यांनी सदस्यांना लाज वाटली पाहिजे असा उल्लेख केला. या शब्दाला मुनगंटीवार यांनी जाेरदार आक्षेप घेतला. या बालकांच्या मृत्यूचे आकडे गेल्या तीन वर्षांतले आहेत. तुम्ही तेव्हा मुख्यमंत्री असलेल्या तुमच्या वडिलांबद्दल असे कसे बोलू शकता असा प्रश्न केला.

हे ही वाचा:

‘आता महामार्गावर टोलनाक्यांऐवजी कॅमेरे बसवले जाणार’

मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निकटवर्तीयांना ईडीकडून अटक

एरंगल गावातील बेकायदा स्टुडिओ प्रकरणाची होणार सखोल चौकशी

सोनाली फोगाट यांची हत्या झाल्याचा दावा

आदिवासी समाजासाठी आपण काही करू शकलो नाही, याची लाज वाटली पाहिजे, असे वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलं. त्यानंतर एकच गोंधळ सुरू झाला. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेत असंसदीय शब्द असल्याचे म्हटले. अडीच वर्ष आपण सत्तेत होता, आपल्या पिताश्रींना लाज वाटली असे म्हणायचे का, असे मुनगंटीवार आक्रमक हाेऊन म्हणाले.विधानसभेत गदाराेळ सुरू झाल्यानंतर विधानसभेच्या सभापतींनी ठाकरे तसेच मुनगंटीवार यांच्या म्हणण्याची नोंद घेतल्याचे जाहीर केले .रेकॉर्ड तपासून तसा शब्द आला असल्यास तो काढून टाकण्यात येईल असं जाहीर केलं.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,969चाहतेआवड दर्शवा
1,945अनुयायीअनुकरण करा
41,600सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा