28 C
Mumbai
Tuesday, September 27, 2022
घरक्राईमनामासोनाली फोगाट यांची हत्या झाल्याचा दावा

सोनाली फोगाट यांची हत्या झाल्याचा दावा

सोनाली फोगाट यांचा भाऊ रिंकू ढाका यांनी काही लोकांवर सोनाली यांची हत्या केल्याचे आरोप केले आहेत.

Related

भाजपा नेत्या सोनाली फोगाट यांचं दोन दिवसांपूर्वी निधन झालं. त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असल्याची माहिती समोर आली होती. मात्र, त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाला नसून त्यांची हत्या करण्यात आली आहे, असा दावा त्यांचे कुटुंबीय करत आहे. सोनाली फोगाट यांचा भाऊ रिंकू ढाका यांनी काही लोकांवर सोनाली यांची हत्या केल्याचे आरोप केले आहेत.

सोनाली फोगाट यांच्या भावाने गोवा पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. सोनाली यांची हत्या त्यांच्याच दोन साथीदारांनी केल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. रिंकू ढाका यांनी आरोप केला आहे की, तिच्या मृत्यूच्या काही वेळापूर्वी सोनाली फोगाट तिची आई, बहीण आणि अन्य एका नातेवाईकाशी फोनवर बोलली होती. त्यांच्याशी बोलताना सोनाली नाराज वाटत होत्या आणि त्यावेळी सोनाली यांनी तिच्या दोन साथीदारांविरुद्ध आईकडे तक्रार केली होती. सोनाली यांच्या मृत्यूनंतर हरियाणातील त्यांच्या फार्महाऊसमधील सीसीटीव्ही कॅमेरे, लॅपटॉप आणि इतर महत्त्वाच्या वस्तू गायब झाल्याचा दावाही रिंकू यांनी केला आहे.

हे ही वाचा:

अमोल मिटकरी हे महाराष्ट्राच्या राजकारणातील विचारांचा काळा डाग

नौशेरामधून लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना अटक

“बिल्किस बानो अत्याचार प्रकरणातील दोषींचा सत्कार करणं चुकीचंच”

प्रज्ञानंद प्रार्थना करून बुद्धिबळ खेळयला करतो सुरुवात

रिंकू ढाका यांनी पोलीस स्टेशनच्या बाहेर पत्रकारांना सांगितले की, सोनालीने आईशी बोलल्यानंतर आम्ही तिला त्या दोन जणांपासून दूर राहण्यास सांगितले होते. तसेच तिला दुसऱ्या दिवशी हिसारला परत जाण्यास सांगितले होते. मी पोलिसांत तक्रार दिली आहे. गेल्या १५ वर्षांपासून त्या भाजपाच्या नेत्या होत्या. सोनालीला न्याय मिळण्यासाठी मदतीची मागणी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे करणार असल्याचंही रिंकू यांनी यावेळी सांगिल आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,965चाहतेआवड दर्शवा
1,942अनुयायीअनुकरण करा
40,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा