31 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरराजकारण“बिल्किस बानो अत्याचार प्रकरणातील दोषींचा सत्कार करणं चुकीचंच”

“बिल्किस बानो अत्याचार प्रकरणातील दोषींचा सत्कार करणं चुकीचंच”

आरोपींची सुटका करण्यात आल्यानंतर आरोपींचं मोठ्या थाटामाटात स्वागत करण्यात आले. यावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Google News Follow

Related

बिल्कीस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणी ११ आरोपींना गुजरात सरकारकडून तुरुंगातून सोडण्यात आले आहे. गुजरात सरकारने या सगळ्यांना १५ ऑगस्ट रोजी सोडलं. त्यांनतर ते बाहेर आल्यानंतर आरोपींचं मोठ्या थाटामाटात स्वागत करण्यात आले. यावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बिल्किस बानो अत्याचार प्रकरणातील दोषींचा सत्कार करणं चुकीचं असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मंगळवार, २३ ऑगस्ट रोजी त्यांनी हे मत व्यक्त केले. भंडारा-गोंदियात एका महिलेवर दोनदा बलात्कार करण्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणासह इतर महिला अत्याचारांच्या घटनांवर विधान परिषदेत चर्चा झाली. त्यावेळी बिल्किस बानोवर अत्याचार करणाऱ्या आरोपींच्या सत्काराचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले.

“या गुन्हेगारांनी १४ वर्षे शिक्षा भोगली होती. गुजरात सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निर्णय घेतला आणि या गुन्हेगारांची सुटका झाली. पण, गुन्हेगार हे गुन्हेगार असतात. त्यांच्या कृत्याचे समर्थन होऊ शकत नाही. ते करणे चुकीचे आहे,” असे स्पष्ट मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

हे ही वाचा:

प्रज्ञानंद प्रार्थना करून बुद्धिबळ खेळयला करतो सुरुवात

नौशेरामधून लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना अटक

दिल्ली, उत्तरप्रदेशात हल्ल्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्याच्या पुण्यातून आवळल्या मुसक्या

पाकिस्तानात ब्राह्मोस पडल्याप्रकरणी तीन अधिकारी बडतर्फ

बिल्किस बानोवरील बलात्कार प्रकरणी ११ जणांची सुटका झाल्यानंतर त्यांचा सत्कार करून मिठाई वाटण्यात आली होती. संबंधित व्हिडीओही व्हायरल झाला होता. त्यानंतर यावर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या़ आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा