27 C
Mumbai
Sunday, October 2, 2022
घरराजकारणकोविडच्या काळात कसा झाला CRZ झोनमध्ये घपला?

कोविडच्या काळात कसा झाला CRZ झोनमध्ये घपला?

आमदार अतुल भातखळकर यांचा गौप्यस्फोट

Related

राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू असून भाजपाचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी मालाड येथील सीआरझेडच्या (CRZ) झोनमध्ये बेकायदेशीर बांधकाम झाले असल्याच्या मुद्द्यावर त्यांनी आवाज उठवत सखोल चौकशीची मागणी केली आहे.

मुंबईत असलेलं उपनगर मालाडमध्ये पश्चिमेला मढ भागात एरंगळमध्ये एमटीडीसीची म्हणजेच राज्य सरकारची सीआरझेड झोनची मोठी जमीन आहे. त्यालाच लागून कलेक्टरचीसुद्धा काही जमीन आहे.

महाविकास आघाडी सरकार जेव्हा सत्तेत होतं तेव्हा सत्ताधारी सतत सकाळ- संध्याकाळ पर्यावरणाच्या नावाने भजनं गात होते. पर्यावरणाच्या मुद्द्याला धरून त्यांनी मुंबईतल्या मेट्रोची वाट लावली. मात्र, असे असताना या एमटीडीसीच्या जागेवर भरणी करण्याकरता अर्ज केले गेले. त्यानंतर या अर्जांना परवानगीही देण्यात आली आहे. तिथे प्रोजेक्ट्स चालू आहेत या निकषावर परवानगी देण्यात आली. सीआरझेड झोनच्या नियमांचं उल्लंघन करून एमटीडीसीने परवानगी दिली.

पुढे या उपनगराचे तत्कालीन पालकमंत्री, शहराचे पालकमंत्री, आमदार यांनी या जागेला भेट दिली. पुढे भरणीच्या कामाला वेग आला. मात्र, जेव्हा परवानगी देण्यात आली तेव्हा अशी अट होती की, एक एकरावर एक हजार झाडं लावायची. पण आज त्या ठिकाणी एकही झाडं नाही. त्या ठिकाणी जी झाडं होती ती नष्ट केली गेली. कांदळवन क्षेत्राच्या अधिकाऱ्यांनी तिथे झाडं असल्याची नोंद केली होती, अशी माहिती अतुल भातखळकर यांनी पत्र दाखवून दिली आहे.

त्यामुळे असे असतानाही भरणी करण्यासाठी परवानगी का देण्यात आली? सर्व अटी का पाळल्या गेल्या नाहीत याची चौकशी करण्याची मागणी अतुल भातखळकर यांनी केली आहे.

या जागेला लागून राज्य सरकारची कलेक्टरची जागा आहे. कोविड च्या काळामध्ये शुटींग बंद होतं तेव्हा या जागेवर तात्पुरतं बांधकाम करण्याची परवानगी देण्यात आली. सीआरझेड झोनचं जे पत्रक फक्त गोव्यासाठी लागू आहे त्याचा आधार घेऊन परवानगी देण्यात आली आहे. सहा महिन्यांसाठी ही परवानगी देण्यात आली होती. पण, दीड- दोन वर्षे झालीत अजून तात्पुरतं बांधकाम तसंच उभं आहे. तात्पुरत बांधकाम हे ५५ फुटांच असून असे १५ ते २५ स्टुडिओ उभे आहेत. या बांधकामाच्या आसपास पेव्हर ब्लॉकसुद्धा टाकलेले आहेत.

हे ही वाचा:

“बिल्किस बानो अत्याचार प्रकरणातील दोषींचा सत्कार करणं चुकीचंच”

प्रज्ञानंद प्रार्थना करून बुद्धिबळ खेळयला करतो सुरुवात

नौशेरामधून लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना अटक

दिल्ली, उत्तरप्रदेशात हल्ल्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्याच्या पुण्यातून आवळल्या मुसक्या

या संपूर्ण प्रक्रियेत लाखो रुपयांचा कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. या स्टुडिओचं भाडं कोणाच्या खिशात गेलं? याला कोणाचा आशीर्वाद आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित केले गेले आहेत.

भरणीला दिलेल्या परवानगीची, अधिकाऱ्यांनी दिलेल्या भेटीमागचं षडयंत्र, अटीप्रमाणे झाडं लावलीत का? या दरम्यान भाजपा कार्यकर्त्यांनी तक्रार केली होती. तेव्हा दखल का घेतली गेली नाही, याची चौकशी व्हावी, अशी मागणी अतुल भातखळकर यांनी केली आहे. ही मागणी लक्षात घेऊन या प्रकरणाची चौकशी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,969चाहतेआवड दर्शवा
1,946अनुयायीअनुकरण करा
41,700सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा