24 C
Mumbai
Friday, December 19, 2025
घरक्राईमनामापंजाबी अभिनेता अमन धालिवालवर अमेरिकेत चाकू, कुऱ्हाडीने हल्ला

पंजाबी अभिनेता अमन धालिवालवर अमेरिकेत चाकू, कुऱ्हाडीने हल्ला

यासंदर्भातील व्हीडिओ व्हायरल झाला असून त्यात या हल्लेखोराने अमनला जखमी केल्याचे दिसते आहे. हल्लेखोर अटकेत

Google News Follow

Related

प्रसिद्ध पंजाबी अभिनेता अमन धालिवाल याच्यावर अमेरिकेत प्राणघातक हल्ला करण्यात आला. अमनला यात गंभीर दुखापत झाली आहे मात्र त्या हल्लेखोराच्या मुसक्या आवळण्यात यश आले आहे.

यासंदर्भातील व्हीडिओ व्हायरल झाला असून त्यात या हल्लेखोराने अमनला जखमी केल्याचे दिसते आहे. ही व्यक्ती विकृत असावी असे प्रथमदर्शनी दिसते आहे. ही व्यक्ती जिममध्ये एका चाकू आणि कुऱ्हाड घेऊन आल्याचे दिसते आणि नंतर ती अमनवर हल्ला करते. मला पाणी द्या, माझा सन्मान करा, तुम्ही माझा फायदा उचलू शकत नाही, असे ती ओरडत असते. नंतर हा हल्लेखोर अमनला धरून ठेवतो. तो अमनला चाकूही दाखवतो. पण थोड्यावेळाने संधी मिळताच अमन त्या हल्लेखोराला पकडतो आणि त्याला खाली पाडतो. तेव्हा तेथील सुरक्षा रक्षक तात्काळ धाव घेऊन त्या हल्लेखोराला जखडतात. या हल्ल्यात अमनच्या डोक्याला मार लागल्याचे दिसते. डोक्यातून रक्त वाहात असल्याचेही व्हीडिओमध्ये पाहायला मिळते. या व्यक्तीने त्याच्यावर हा हल्ला का केला हे मात्र स्पष्ट झालेले नाही.

हे ही वाचा:

कार्यालय स्वच्छतेतून सरकारला मिळाले ६३ कोटी रुपये

पित्रोडा म्हणतात, भारताविरोधात परदेशात का बोलायचे नाही? समस्या काय आहे?

धक्कादायक !! अमृता फडणवीस यांना धमकावून १ कोटीची लाच देऊ केली

खलिस्तानी समर्थकांचे आता ब्रिस्बेनमधील भारतीय दूतावास लक्ष्य

अमन हा पंजाबी फिल्म इंडस्ट्रीमधील कलाकार आहे. अनेक पंजाबी गाण्यांमध्ये तो झळकला आहे. बॉलीवूड चित्रपटांतही त्याने भूमिका केल्या आहेत. हृतिक रोशनच्या जोधा अकबर या चित्रपटातही त्याने काम केले आहे. पंजाबी व्यक्तीवर झालेला हा आणखी एक हल्ला आहे. याआधी, कॅनडाच्या ओंटारियोत २१ वर्षीय शीख तरुणीची हत्या झाली होती. पवनप्रीत कौर असे त्या तरुणीचे नाव आहे. गाडीत पेट्रोल भरत असताना तिच्यावर अज्ञात व्यक्तीने गोळी घातली. या घटनेआधीही चार पंजाबी व्यक्तींची हत्या अमेरिकेत झाली होती.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा