26 C
Mumbai
Tuesday, March 28, 2023
घरक्राईमनामादहशतवादाने ग्रस्त देशात पाकिस्तानने अफगाणिस्तानलाही टाकले मागे

दहशतवादाने ग्रस्त देशात पाकिस्तानने अफगाणिस्तानलाही टाकले मागे

पाकिस्तानने अफगाणिस्तानला टाकले मागे

Google News Follow

Related

‘ग्लोबल टेररिझम इंडेक्सच्या’ अहवालांत सर्वाधिक दहशतवादग्रस्त देश म्हणून अफगणिस्तानचे वर्णन केले आहे पण, अफगाणिस्तानात दहशतवादी घटनांमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये ५८ टक्क्यांची घट झाल्याचे सुद्धा दिसत आहे. जगातील सर्वाधिक दहशतवाद ग्रस्त देश म्हणून जरी अफगणिस्तानची ओळख असली तरी पाकिस्तानांत दहशतवादामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. ‘इन्स्टिटयूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीसच्या वार्षिक ग्लोबल  टेररिझम  इंडेक्स’ अहवालातील आकडेवारी हि असे दर्शविते कि, २०२२ साली आफ्रिकन देश बुर्किना फासोमध्ये दहशतवादाचे  बळी पडलेले सर्वाधिक लोक आहेत. आत्ता २०२३ मध्ये हा ग्लोबल टेररिझम इंडेक्स अहवाल हा २०२२ मध्ये जगभरातील दहशतवादाच्या परिस्थितीचे आकलन करून जाहीर करण्यात आला आहे.

या अहवालाप्रमाणे दहशतवाद प्रभावित देशांमध्ये अफगाणिस्तान हा पहिल्या स्थानावर आहे बुर्किना फासो हे दुसऱ्या स्थानावर , सोमालिया हे तिसऱ्या स्थानावर, माली हे चवथ्या तर सीरिया हे पाचव्या स्थानावर आहे. तर पाकिस्तान हे चक्क सहाव्या स्थानावर आहे पण तिथल्या दहशतवादी घटनांमध्ये ठार झालेल्या लोकांची संख्या हि अफगणिस्तानच्या पेक्षा जास्त आहे. आणि जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. २०२२ साली पाकिस्तानांत दहशतवादी घटनांमध्ये ६४३ लोक मरण पावले तर गेल्या वर्षीच्या तुलनेत २९२ म्हणजे १२० टक्के हे प्रमाण जास्त आहे. पाकिस्तानात दहशतवादी घटनांमध्ये मृत्युमुखी पडलेले ५५ टक्के हे पोलीस कर्मचारी किंवा लष्कराचे कर्मचारी आहेत. २००७ ते २०२२ या दरम्यानच्या अहवालानुसार पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्यांमध्ये १४९२० लोकांचा मृत्यू झाला आहे.

हे ही वाचा:

धक्कादायक !! अमृता फडणवीस यांना धमकावून १ कोटीची लाच देऊ केली

भ्रष्टाचारविरोधी विभागाची राजन साळवी आणि कुटुंबियांकडे नजर

आधी जोरदार भूकंप.. आता न्यूझीलंडमध्ये त्सुनामीची भीती

राहुल गांधी आज येणार संसदेत, लंडनमधील भाषणाबद्दल बोलणार का?

२०२२ च्या अहवालानुसार इस्लामिक स्टेट खोरासान सर्वात सक्रिय असलेले दहशतवादी संघटना म्हणून समोर आली आहे. या दहशतवादी संघटनेने २०२२ मध्ये सर्वाधिक म्हणजे ४२२ लोकांची हत्या अफगाणीस्थामध्ये केली आहे. सर्वात पहिल्या स्थानावर दहशतवादी संघटना बुर्किना फासो असून तिथे २०२२ मध्ये दहशतवादी घटनांमध्ये ११३५ लोक्कांचा मृत्यू झाला तर २०२१ मध्ये बुर्किना फासो अशा घटनांमध्ये ७५९ लोकांचा मृत्यू झाला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,876चाहतेआवड दर्शवा
2,035अनुयायीअनुकरण करा
65,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा