29 C
Mumbai
Monday, December 22, 2025
घरक्राईमनामासंजय राऊतांच्या नावाचा वापर करून सुजीत पाटकरांनी मिळवले जम्बो कोविड सेंटरचे टेंडर

संजय राऊतांच्या नावाचा वापर करून सुजीत पाटकरांनी मिळवले जम्बो कोविड सेंटरचे टेंडर

ईडीचा आरोपपत्रात दावा

Google News Follow

Related

मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी सुजित पाटकर याने दहिसर आणि वरळीच्या कोविड जंबो सेंटरच्या निविदा चर्चेदरम्यान अतिरिक्त महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना भेटण्यासाठी त्यांचे निकटवर्ती आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या नावाचा वापर केल्याचे अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने आरोपपत्रात म्हटले आहे.

मुंबई कथित जंबो कोविड सेंटर घोट्याळ्याप्रकरणी ईडीने नुकतेच विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या आरोपपत्रात स्पष्ट म्हटले आहे की, पाटकर  यांनी कंपनी स्थापन करण्यापूर्वी लाइफलाइन हॉस्पिटलचे लेटरहेड जयस्वाल यांना देण्यास वापरले. पाटकर यांनी संजय राऊत यांच्या नावाचा वापर करून टेंडर मिळवले, यासाठी जयस्वाल यांनी पाटकरांना मदत केली. तसेच पाटकर आपल्या राजकीय संपर्काचा वापर करून निविदा प्रक्रियेची पूर्वमाहिती मिळवत होता.

तसेच या कंपनीने ६० टक्के कमी कर्मचारी पुरवले होते. कोरोनाबाधित रुग्णांच्या आरोग्याशी तडजोड करुन जास्तीची बिले मुंबई महानगरपालिकेला पाठवली होती. शिवाय कोरोना बाधित रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या  कोविड १९ उपचार केंद्राला निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार फटका बसला होता. या चक्रीवादळावेळी केंद्रातील सर्व रुग्णांना एका दिवसासाठी इतर रुग्णालयात हलवले होते त्या दिवशीची बिलेही पाठविण्यात आली.

डॉ. किशोर बिसुरे यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांकडे हा मुद्दा मांडला होता. बिलांमधील तफावत प्रकाशझोतात आणली होती. मात्र, तरीही कारवाई झाली नाही. केवळ ३१ लाखांचा दंड ठोठावण्यात आला. संजय राऊतांच्या नावाचा वापर करून ३२ कोटी ६० लाखांचा कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यात आला. या कॉन्ट्रॅक्टविषयी संजय राऊतांना माहित होते.

हे ही वाचा:

एलॉन मस्क यांनी ट्रुडो यांच्याविरोधात थोपटले दंड!

ते जर्मनीच्या अध्यक्षांचे निवासस्थान, बोर्डिंग स्कूल नव्हे!

अविनाश साबळेची सोनेरी धाव!

तजिंदरपालसिंगने केली सुवर्णविजेती गोळाफेक!

तपासादरम्यान, ईडीने पोस्टाद्वारे या कंपनीने नियुक्त केलेल्या ५२५ वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पत्र पाठवले. त्यापैकी काही कर्मचाऱ्यांनी उत्तरे दिली असून काहींनी त्यांच्या उत्तरात सादर केले आहे की, त्यांनी कधीही दहिसर किंवा वरळी कोविड सेंटरमध्ये काम केलेले नाही. काहींनी कमी कालावधीसाठी काम केले आहे परंतु त्यांची उपस्थिती खूप मोठ्या कालावधीसाठी दर्शविली गेली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा