27 C
Mumbai
Tuesday, December 16, 2025
घरविशेषमहाराष्ट्रात जातीय सलोखा ‍बिघडवणाऱ्या नेत्यांवर भाजपाचे लक्ष!

महाराष्ट्रात जातीय सलोखा ‍बिघडवणाऱ्या नेत्यांवर भाजपाचे लक्ष!

मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांची माहिती

Google News Follow

Related

राज्यामध्ये काही विशेष पक्ष, गट आणि त्यांचे विशेष नेते हे महाराष्ट्रातील जाती जातीत मधला संवाद बिघडवून विसंवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी काही पक्ष, काही गट आणि काही नेते आणि काही गटाचे नेते हे राज्यातलं जातीय सलोखांच वातावरण बिघडवण्याचा तर प्रयत्न करत नाहीत ना याची माहिती सुद्धा आजच्या कार्यकारणीच्या बैठकीत घेण्यात आल्याचे मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी दिली.

दादर वसंत स्मृती येथे आज भाजपा महाराष्ट्र पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीची सुरूवात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीचे नियोजन डोळ्यासमोर ठेवून जे रचना केंद्र स्तरावर ठरले यासंबंधीचा मार्गदर्शन राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी केले तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाने या बैठकीचा समारोप करण्यात आला. या बैठकी विषयी माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी माध्यमांना दिली.

यावेळी आमदार आशिष शेलार यांनी सांगितले की, प्रदेश पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांची संपूर्ण राज्याची महत्त्वाची पूर्वनियोजित बैठक एका विशिष्ट कालावधीनंतर सातत्याने आम्ही घेत असतो यामध्ये राज्यभरात चाललेल्या सर्व राजकीय घटना संघटनात्मक बांधणी, केंद्राचे आणि स्थानिक कार्यक्रमाचे नियोजन आणि या सगळ्यातून भारतीय जनता पक्षाच्या संघटनेच्या रचनेच्या आधारावर सामान्य माणसाची सेवा अजून चांगली कशी करता येईल यासंबंधीचा आढावा, नियोजन आम्ही अशा बैठकांमध्ये करण्यात येतो.

देशातील महिलांना आरक्षण देणारे विधेयक मांडून ते लोकसभा आणि राज्य सभेत मंजूर केल्याबद्दल आजच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानणारा ठराव मंजूर करण्यात आला. हा ठराव माधवी नाईक यांनी मांडला तर चित्रा वाघ यांनी त्याला अनुमोदन दिले.

हे ही वाचा:

दिल्लीसह उत्तर भारत हादरला!

मुंबईमधील स्विमिंग पूलमध्ये शिरली मगर

नांदेड मधील रुग्णांच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई होईल!

बांगलादेशात नऊ महिन्यात डेंग्यूने घेतेले १ हजारहून अधिक बळी

प्रत्येक बैठकीत गेल्या काही काळाती कार्यक्रमांचा आढावा घेत असतो पक्षाचा तसेच आमचे काही विशेष कार्यक्रम घेऊन भारतीय जनता पार्टी शासकीय यत्रणेसोबत संघटक म्हणून सुद्धा या उतरली आहे. यामध्ये बूथ सशक्तिकरण, मेरी माटी मेरा देश अशा सगळया कार्यक्रमाचा आढावा व आगामी नियोजन याबाबतही चर्चा करण्यात आल्याची माहिती आमदार ॲड आशिष शेलार यांनी दिली.राज्यांमध्ये महाविजय २०२४ हा एक विषय घेऊन आम्ही उतरलो यामध्ये ४५ प्लस लोकसभेच्या जागा आणि सध्याची राजकीय परिस्थिती आणि आपल्या भूमिका काय असल्या पाहिजेत त्याबद्दलचे मार्गदर्शन करण्यात आले.

आजच्या बैठकीत विशेष भारतीय जनता पार्टीकडून माहिती घेउन चिंता सुद्धा व्यक्त करण्यात आली. तो विषय म्हणजे, राज्यामध्ये काही विशेष पक्ष आणि विशेष नेते हे राज्याचा महाराष्ट्रातलं जाती जातीत वीस संवाद निर्माण करण्याचा प्रयत्न स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी काही पक्ष काही गट आणि काही नेते आणि काही गटाचे नेते करीत तर नाही ना, याची माहिती सुद्धा आजच्या बैठकीत घेण्यात आली.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा