31 C
Mumbai
Friday, February 20, 2026
घरबिजनेससोन्याची झेप, चांदीची दमदार कामगिरी

सोन्याची झेप, चांदीची दमदार कामगिरी

गुंतवणूकदारांचा सुरक्षित पर्यायाकडे वाढता ओढा

Google News Follow

Related

१८ फेब्रुवारी रोजी सोने आणि चांदीच्या दरात हलकी वाढ पहायला मिळाली. मल्टी कमोडिटी एक्स्चेंज ऑफ इंडिया (एमसीएक्स) वर एप्रिल फ्युचर्स सोन्याचा दर सुमारे १,५२,६१५ रुपये प्रति १० ग्रॅम इतका झाला, जो मागील सत्राच्या तुलनेत सुमारे ०.७९ टक्क्यांनी वाढला. दिवसभरात सोन्याने १,५३,००० रुपयांच्या आसपास उच्चांकही गाठला.

चांदीच्या दरात अधिक मोठी तेजी दिसली. एमसीएक्सवर मार्च फ्युचर्स चांदीचा दर सुमारे २,३६,१४५ रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचला. यात जवळपास ३.२२ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. दिवसभरातील व्यवहारात चांदीने २,३८,००० रुपयांच्या आसपासची पातळीही स्पर्श केली.

आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकेतील कमोडिटी एक्स्चेंज (कोमेक्स) वर सोन्याचा दर सुमारे ४,९३२ डॉलर प्रति औंस इतका होता, तर चांदीचा दर सुमारे ७५.५२५ डॉलर प्रति औंस नोंदवला गेला. जागतिक स्तरावर डॉलरमध्ये झालेली चढ-उतार, व्याजदरांबाबतची अनिश्चितता आणि सुरक्षित गुंतवणुकीची वाढती मागणी यामुळे या दरांना आधार मिळत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदींकडून कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी MANAV व्हिजन

विजय मल्ल्या भारतात कधी येणार? मुंबई उच्च न्यायालयाला दिले उत्तर

हिंदू पोलिस अधिकाऱ्याची हत्या करणाऱ्या बांगलादेशी विद्यार्थी नेत्याला अटक

‘स्कायरूट’ बनणार भारतातील पहिले स्पेस- टेक युनिकॉर्न!

दरम्यान, बाजारातील अस्थिरता कमी झाल्याने राष्ट्रीय शेअर बाजार आणि एमसीएक्स यांनी सोने व चांदी फ्युचर्सवरील अतिरिक्त मार्जिन काढून घेतले आहे. यापूर्वी सोन्यावर ३ टक्के आणि चांदीवर ७ टक्के अतिरिक्त मार्जिन आकारले जात होते. हे अतिरिक्त मार्जिन हटवल्यामुळे व्यापाऱ्यांना कमी भांडवलात व्यवहार करण्याची संधी मिळणार आहे.

१९ फेब्रुवारीच्या सुरुवातीच्या व्यवहारात सोन्याचा दर आणखी वाढून सुमारे १,५६,२०४ रुपये प्रति १० ग्रॅम झाला, तर चांदीचा दर २,४८,८३२ रुपये प्रति किलो इतका नोंदवला गेला.

तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेतील महागाईचे आकडे, फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर धोरणाबाबतचे संकेत आणि जागतिक आर्थिक घडामोडी यावर पुढील काही दिवस सोन्या-चांदीच्या दरांची दिशा अवलंबून असेल. सध्या मात्र दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये तेजीचे वातावरण कायम असल्याचे दिसून येत आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
294,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा