30 C
Mumbai
Sunday, November 29, 2026
घरबिजनेसखोल समुद्रातील तेल उत्खननाला केंद्राचा वेग

खोल समुद्रातील तेल उत्खननाला केंद्राचा वेग

परदेशी कंपन्यांसाठी नियम शिथिल

Google News Follow

भारताने खोल समुद्रातील तेल आणि नैसर्गिक वायूच्या साठ्यांचा शोध घेण्यासाठी आपल्या लिलाव धोरणात महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. आंतरराष्ट्रीय तेल कंपन्यांना भारतीय ऊर्जा क्षेत्रात गुंतवणुकीसाठी आकर्षित करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने महसूल वाटपावर आधारित बोली प्रक्रिया रद्द केली आहे. सलग दोन लिलाव फेऱ्यांना अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या धोरणानुसार, कंपन्यांच्या आर्थिक बोलीपेक्षा त्यांची तांत्रिक क्षमता, उत्खननाचा अनुभव आणि प्रस्तावित कामाच्या गुणवत्तेला अधिक महत्त्व दिले जाणार आहे.

ओपन एकरेज लायसन्सिंग पॉलिसीच्या दहाव्या आणि अकराव्या फेरीतील एकूण १८ तेल आणि गॅस ब्लॉक्ससाठी हे बदल लागू करण्यात आले आहेत. या ब्लॉक्सचे एकूण क्षेत्रफळ सुमारे १ लाख ६२ हजार चौरस किलोमीटर आहे. नव्या मूल्यांकन पद्धतीत प्रस्तावित भूकंपीय सर्वेक्षण आणि उत्खनन कार्यक्रमासाठी ८० गुण, कंपनीच्या पूर्वीच्या कामगिरीसाठी १० गुण, तर खोल समुद्रातील ड्रिलिंग अनुभवासाठी १० गुण निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रत्यक्ष अनुभव असलेल्या जागतिक कंपन्यांना भारतीय बाजारपेठेत प्रवेश मिळण्याची शक्यता वाढणार आहे.

हे ही वाचा:
भारताच्या परकीय चलनसाठ्याला पुन्हा मोठा धक्का

आठ कंपन्यांना आयपीओ आणण्यासाठी सेबीची मंजुरी

ऊर्जा क्षेत्रात २०० लाख कोटींच्या गुंतवणुकीची संधी

भारतीय शेअर बाजाराची सात महिन्यांत ९ लाख कोटींची कमाई

परदेशी कंपन्यांना भारतीय सरकारी तेल कंपन्यांसोबत भागीदारी करणेही अधिक सोपे करण्यात आले आहे. ओएनजीसी किंवा ऑइल इंडिया लिमिटेड यांसारख्या कंपन्यांसोबत काम करणाऱ्या पात्र परदेशी भागीदारांना आर्थिक पात्रतेच्या काही अटींमधून सूट मिळू शकते. याशिवाय, बोली प्रक्रियेतील आर्थिक अटीही शिथिल करण्यात आल्या आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे जागतिक ऊर्जा कंपन्यांचा सहभाग वाढण्यास आणि खोल समुद्रातील तेल व गॅस उत्खननासाठी आवश्यक असलेली मोठी गुंतवणूक आकर्षित होण्यास मदत होऊ शकते.

दरम्यान, ‘समुद्र मंथन’ उपक्रमांतर्गत खोल समुद्रातील उत्खननाला चालना देण्यासाठी ८४ हजार ८४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये ६० खोल समुद्री विहिरींच्या ड्रिलिंगचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, पात्र प्रकल्पांना सरकारी आर्थिक मदतही दिली जाणार आहे. दरम्यान, १८ ब्लॉक्ससाठी बोली सादर करण्याची अंतिम मुदत १७ डिसेंबर २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. भारताची कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करणे, देशांतर्गत उत्पादन वाढवणे आणि ऊर्जा सुरक्षेला बळकटी देणे, या व्यापक उद्दिष्टांच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
343,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा