27 C
Mumbai
Tuesday, July 7, 2026
घरबिजनेसभारतीय रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीचा विक्रमी स्फोट

भारतीय रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीचा विक्रमी स्फोट

अवघ्या तीन महिन्यांत ७०% वाढ

Google News Follow

Related

भारतीय रिअल इस्टेट क्षेत्र पुन्हा एकदा वेगाने भरारी घेत असून देशांतर्गत आणि परदेशी गुंतवणूकदारांचा या क्षेत्रावरील विश्वास अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसत आहे. एप्रिल ते जून २०२६ या तिमाहीत भारतीय रिअल इस्टेट क्षेत्रात तब्बल २.९ अब्ज डॉलर, म्हणजेच सुमारे २५ हजार कोटी रुपयांची संस्थात्मक गुंतवणूक झाली आहे. ही गुंतवणूक गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत तब्बल ७० टक्क्यांनी अधिक असून, जागतिक आर्थिक अनिश्चिततेच्या काळातही भारतातील मालमत्ता बाजार गुंतवणूकदारांसाठी आकर्षणाचे प्रमुख केंद्र ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मालमत्ता सल्लागार संस्था कॉलियर्सच्या अहवालानुसार, जानेवारी ते जून २०२६ या पहिल्या सहामाहीत भारतीय रिअल इस्टेट क्षेत्रात एकूण ४.५ अब्ज डॉलरची संस्थात्मक गुंतवणूक झाली. ही रक्कम गेल्या वर्षाच्या तुलनेत सुमारे ५० टक्के अधिक असून, मागील सहा वर्षांतील पहिल्या सहामाहीतील सर्वोत्तम कामगिरी म्हणून तिची नोंद झाली आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीबरोबरच रिअल इस्टेट क्षेत्रही नव्या उंचीवर पोहोचत असल्याचे संकेत मिळत आहेत.
हे ही वाचा:
“ही खऱ्या बंधुत्वाची भावना”; व्हेनेझुएलाकडून भारताचे आभार

राम मंदिर चोरीप्रकरणातील आरोपींच्या जमीन, बँक व्यवहारांची नोंद पोलिसांकडे

बँक ऑफ बडोदा आणि जीआयसी हाऊसिंग फायनान्सवर RBIचा दंड

‘आमचाच गट खरा’ म्हणत ऋतुव्रत बॅनर्जी यांनी घेतला तृणमूल मुख्यालयाचा ताबा

या कालावधीत देशांतर्गत गुंतवणूकदारांनी १.३३ अब्ज डॉलरची गुंतवणूक करत एकूण गुंतवणुकीपैकी ४६ टक्के वाटा उचलला, तर परदेशी गुंतवणूकदारांनी १.५४ अब्ज डॉलरची गुंतवणूक करून ५४ टक्के हिस्सा नोंदवला. पश्चिम आशियातील तणाव आणि जागतिक आर्थिक आव्हानांनंतरही परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारावरील विश्वास कायम ठेवल्याचे या आकडेवारीतून दिसून येते.

गुंतवणुकीचा सर्वाधिक ओघ ऑफिस स्पेस, डेटा सेंटर आणि मोठ्या व्यावसायिक प्रकल्पांकडे वळला आहे. पहिल्या सहामाहीत केवळ ऑफिस मालमत्तेमध्येच सुमारे १.९ अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली, जी एकूण गुंतवणुकीच्या ४० टक्क्यांहून अधिक आहे. याशिवाय मिश्र-वापर (मिक्स्ड-यूज) प्रकल्प, डेटा सेंटर आणि इतर पर्यायी मालमत्ता वर्गातही मोठ्या प्रमाणावर भांडवल आले. मात्र निवासी गृहनिर्माण क्षेत्रातील गुंतवणूक ४३ टक्क्यांनी घटून सुमारे ५० कोटी डॉलरवर आली आहे. यावरून सध्या गुंतवणूकदारांचा कल उत्पन्न देणाऱ्या व्यावसायिक मालमत्तांकडे अधिक असल्याचे स्पष्ट होते.

शहरनिहाय विचार केला असता, चेन्नई आणि बेंगळुरू यांनी सर्वाधिक गुंतवणूक आकर्षित केली आहे. या दोन शहरांनी मिळून पहिल्या सहामाहीत सुमारे १.२ अब्ज डॉलरची गुंतवणूक खेचून आणली, जी एकूण गुंतवणुकीच्या जवळपास २७ टक्के आहे. विशेषतः आयटी, कॉर्पोरेट कार्यालये आणि आधुनिक व्यावसायिक पायाभूत सुविधांमुळे या शहरांमध्ये गुंतवणूकदारांचा विश्वास अधिक मजबूत झाला आहे. याशिवाय मल्टी-सिटी प्रकल्प आणि उदयोन्मुख शहरांमध्येही गुंतवणुकीची गती वाढत असल्याचे दिसून येत आहे.

तज्ज्ञांच्या मते, भारताची मजबूत आर्थिक वाढ, कॉर्पोरेट विस्तार, डेटा सेंटरची वाढती मागणी, पायाभूत सुविधांमध्ये होत असलेली गुंतवणूक आणि व्यवसायासाठी अनुकूल वातावरण यामुळे येत्या काही महिन्यांतही भारतीय रिअल इस्टेट क्षेत्रातील गुंतवणूक मजबूत राहण्याची शक्यता आहे. विशेषतः व्यावसायिक मालमत्ता आणि पर्यायी मालमत्ता वर्ग आगामी काळात गुंतवणूकदारांसाठी सर्वाधिक आकर्षणाचे केंद्र राहतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
320,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा