29.4 C
Mumbai
Saturday, July 11, 2026
घरबिजनेसलॉर्ड्स मार्क इंडस्ट्रीजचे 'बीएसई'वर शानदार पदार्पण

लॉर्ड्स मार्क इंडस्ट्रीजचे ‘बीएसई’वर शानदार पदार्पण

एआय-आधारित हेल्थकेअर तंत्रज्ञानामुळे गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले

Google News Follow

Related

हेल्थकेअर आणि फार्मास्युटिकल क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून नावीन्यपूर्ण क्रांती घडवून आणणाऱ्या ‘लॉर्ड्स मार्क इंडस्ट्रीज लिमिटेड’ या कंपनीचे शुक्रवार, १० जुलै रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये अत्यंत शानदार कार्यक्रमात लिस्टिंग झाले. यापूर्वी बाजारात लिस्टेड असलेल्या ‘क्रॅटोस एनर्जी’ या कंपनीचे ‘लॉर्ड्स मार्क इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड’मध्ये यशस्वीरीत्या रिव्हर्स मर्जर झाले आहे. या विलीनीकरणानंतर आता ही कंपनी ‘लॉर्ड्स मार्क इंडस्ट्रीज लिमिटेड’ या नवीन नावाने आणि नव्या ओळखीसह बीएसईवर (BSE) गुंतवणुकीसाठी उपलब्ध झाली आहे.

हेल्थकेअर, फार्मा क्षेत्रातील लॉर्ड मार्कची वाटचाल अत्यंत दिमाखदार आहे. या यशस्वी वाटचालीमागे कंपनीचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक (MD) सच्चिदानंद उपाध्याय यांचे दीर्घकालीन व्हिजन आहे. तसेच, नामांकित उद्योजक आणि दिग्गज गुंतवणूकदार प्रशांत कारुळकर यांनी या कंपनीत मोठी गुंतवणूक केली असून, त्यांच्या उपस्थितीमुळे बाजारातील गुंतवणूकदारांचा विश्वास आणखी दृढ झाला आहे. बीएसईमध्ये झालेल्या शानदार कार्यक्रमात प्रशांत कारुळकर यांच्या सौभाग्यवती उद्योजिका शीतल कारुळकर, बीएसईच्या लिस्टींग विभागाच्या प्रमुख राधा किर्थिवासन तसेच लॉर्ड मार्क आणि बीएसईची टीम उपस्थित होती.
हे ही वाचा:
१० वर्षांनंतर मित्सुबिशी पुन्हा प. बंगालमध्ये दाखल…

ठाण्यातील प्रसिद्ध फूड आउटलेटवर FDA ची धडक कारवाई !

स्पेनचा सेमीफायनलमध्ये दिमाखदार प्रवेश

आषाढी वारी हायटेक! संपर्कासाठी प्रथमच ‘बीबीपीपीडीआर’ प्रणाली

वारी एनर्जीज लिमिटेड, स्मार्टवर्क्स कोवर्किंग स्पेसर्स प्रायव्हेट लिमिटेड, डेन्टा रेमेडीज प्रायव्हेट लिमिटेड, आनंद राठी वेल्थ लिमिटेड, डेनेक्स इंटरनॅशनल, एक्मे फिनट्रेड (इंडिया) लिमिटेड आदी अनेक यशस्वी कंपन्यांमधील गुंतवणुकीच्या मोठ्या अनुभवानंतर प्रशांत कारुळकर आता लॉर्ड्स मार्क इंडस्ट्रीजशी जोडले गेले आहेत.
लॉर्ड्स मार्क इंडस्ट्रीज ही १९७७ पासून आरोग्य क्षेत्रात कार्यरत असून, अलीकडच्या काळात कंपनीने कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांच्या निर्मितीत विशेष प्राविण्य मिळवले आहे. रोगनिदानाची संपूर्ण संकल्पनाच बदलून टाकणारी उपकरणे कंपनीने विकसित कलेली आहे.

‘डोझी’ हे कंपनीचे अत्यंत लोकप्रिय उपकरण आहे. रुग्णाच्या शरीराला कोणतेही सेन्सर किंवा वायर्स न जोडता, केवळ गादीखाली ठेवलेल्या सेन्सरशीटच्या मदतीने रुग्णाचे हृदयाचे ठोके, श्वासोच्छ्वास, रक्तदाब आणि झोपेची गुणवत्ता यावर अचूक लक्ष ठेवले जाते. या डेटाचे ‘एआय’द्वारे विश्लेषण केले जाते आणि रुग्णाची तब्येत बिघडल्यास डॉक्टरांना ‘अर्ली वॉर्निंग अलर्ट’ मिळतो.

महिलांमधील स्तनाच्या कर्करोगाचे वेळीच निदान करण्यासाठी सरकारी उपक्रम CMET सोबत कंपनीने हातमिळवणी करून एआय-आधारित विशेष उपकरण बाजारात आणले आहे. आयएसओ-प्रमाणित रॅपिड टेस्टिंग किट्स आणि बायोकेमिस्ट्री रिएजंट्सच्या माध्यमातून सिकलसेल चाचणी सुलभ करण्यात आली आहे.

रक्त न काढता आणि तज्ज्ञांच्या मदतीशिवाय घरच्या घरी लोक स्वतःहून रक्त तपासणी करू शकतील. विविध आजारांचे निदान करू शकतील, अशी अत्याधुनिक उत्पादने कंपनीने बाजारात आणली आहेत. लॉर्ड्स मार्क इंडस्ट्रीज आपल्या प्रगत तंत्रज्ञानाच्या जोरावर आगामी काळात आरोग्य आणि शेअर बाजारात मोठी आर्थिक झेप घेण्यासाठी सज्ज झाली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
320,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा