लक्झरी कार उत्पादक कंपनी मर्सिडीज- बेंझने भारतात सप्टेंबरमध्ये विक्रमी विक्री करत आपली कामगिरी उंचावली आहे. नुकत्याच संपलेल्या नवरात्रीच्या काळात दर सहा मिनिटांनी मर्सिडीज- बेंझने एक नवीन कार विकली. प्रति वाहन सरासरी १ कोटी रुपये किंमतीसह, ही वाढ भारतातील तीन- पॉइंटेड स्टार ब्रँडसाठी आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी असल्याचे म्हटले जात आहे.
जुलै- सप्टेंबर हा तिमाही काळ मर्सिडीज- बेंझ इंडियासाठी सर्वात महत्त्वाचा आणि उत्तम होता. या कालावधीत त्यांच्या एकूण ५,११९ युनिट्सची विक्री झाली. गेल्या वर्षी याच तिमाहीत विकल्या गेलेल्या ५,११७ युनिट्सपेक्षा किंचित जास्त. उल्लेखनीय बाब म्हणजे, तिमाहीच्या शेवटच्या नऊ दिवसांत २,५०० हून अधिक कार, जे तिमाही विक्रीच्या जवळपास निम्मे होते, वितरित करण्यात आल्या.
मर्सिडीज- बेंझ इंडियाचे एमडी आणि सीईओ संतोष अय्यर यांनी सांगितले की, २२ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर दरम्यान मागणीत लक्षणीय वाढ झाली. कंपनीने दररोज सुमारे २७० कार विकल्या. दर तासाला अंदाजे १० ते १२ कार ज्याची सरासरी किंमत १ कोटी रुपये होती. त्यांनी पुढे सांगितले की, २२ सप्टेंबर रोजी नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून लागू झालेल्या लक्झरी कारवरील जीएसटी दर कपातीमुळे ग्राहकांचा ओढ चांगलाच वाढला आणि या तिमाहीत विशेष ऑफर्ससह विक्री वाढीला हातभार लागला.
मर्सिडीज- बेंझची प्रमुख ऑल-इलेक्ट्रिक G580 एडिशन वन, ज्याची किंमत ३.१ कोटी रुपये आहे, ती विकली गेली असून पुढील बॅचसाठी बुकिंग आता खुली आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच ग्राहकांच्या भावना लक्षात घेऊन कंपनीने “ड्रीम डेज” उपक्रम सुरू केला होता. ज्यामध्ये ग्राहकांना लवचिक आर्थिक उपाय दिले गेले. यातील पर्यायांपैकी एक म्हणजे ग्राहकांना ११ महिन्यांसाठी कमी ईएमआय आणि वर्षातील फक्त एका महिन्यासाठी जास्त ईएमआय देण्याची परवानगी होती, ज्यामुळे मर्सिडीज-बेंझ घेणे ग्राहकांना सोपे झाले.
दुसरा उपक्रम म्हणजे “की-टू-की” अंतर्गत, मर्सिडीज- बेंझने त्यांच्या उच्च श्रेणीतील ग्राहकांना लक्ष्य केले. पुढच्या वर्षी येणाऱ्या एस-क्लासची वाट पाहणाऱ्यांना सध्याचे मॉडेल खरेदी करण्यास प्रोत्साहित करण्यात आले आणि लाँच झाल्यावर नवीन आवृत्तीसाठी सहज एक्सचेंजची हमी देण्यात आली.
‘या’ संशोधनासाठी भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा; तीन शास्त्रज्ञ होणार सन्मानित
”काशीमध्ये हनुमान चालीसा नाही तर अजानही नाही”
दिवाळी होणार गोड! नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचे पॅकेज
अमेरिकेच्या तिजोरीला लागलेल्या टाळ्याचा फटका हवाई वाहतुकीला
२०२५ च्या पहिल्या सहा महिन्यांत, मर्सिडीज-बेंझ इंडियाने ९,३५७ युनिट्स विकल्या, जे मागील वर्षाच्या तुलनेत ४% वाढ दर्शवते. आता कंपनीला दिवाळी हंगामात चांगल्या विक्रीची अपेक्षा आहे. आताच्या झालेल्या चांगल्या विक्रीमुळे कंपनीला धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या आधी आत्मविश्वास मिळाला आहे. २०२४ मध्ये, मर्सिडीज- बेंझने मागील वर्षाच्या तुलनेत १२% वाढ नोंदवली, १९,५६५ युनिट्स विकल्या. २०२५ मध्ये, सणासुदीच्या वाढ असूनही कॅलेंडर-वर्षातील वाढ स्थिर राहण्याची कंपनीची अपेक्षा आहे.







