24 C
Mumbai
Thursday, February 19, 2026
घरबिजनेसराष्ट्रीय शेअर बाजारातील (NSE) गुंतवणूकदार खात्यांची संख्या २४ कोटी पार

राष्ट्रीय शेअर बाजारातील (NSE) गुंतवणूकदार खात्यांची संख्या २४ कोटी पार

नोंदवला नवा विक्रम

Google News Follow

Related

भारतीय राष्ट्रीय शेअर बाजाराने (NSE) नोव्हेंबर २०२५ मध्ये आणखी एक मोठा टप्पा गाठला आहे. एनएसईवरील एकूण युनिक गुंतवणूकदार खाती २४ कोटींच्या (२४० दशलक्ष) वर गेली आहेत. ऑक्टोबर २०२४ मध्ये २० कोटींचा टप्पा ओलांडल्यानंतर फक्त वर्षभरात हा नवीन विक्रम नोंदवला गेला आहे.

३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत युनिक नोंदणीकृत गुंतवणूकदारांची संख्या १२.२ कोटी इतकी झाली असून, २२ सप्टेंबर २०२५  रोजी १२ कोटींचा टप्पा पार करण्यात आला होता.

राज्यानुसार गुंतवणूकदार खात्यांचे वितरण

गुंतवणूकदार अनेक ब्रोकर्सकडे खाती ठेवू शकतात, त्यामुळे एका व्यक्तीची अनेक क्लायंट कोड्स असू शकतात. त्यातही  महाराष्ट्रने ४ कोटीपेक्षा जास्त गुंतवणूकदार खात्यांसह (१७ % हिस्सा) अव्वल स्थान राखले. त्याखालोखाल उत्तर प्रदेश – २.७ कोटी (११ % हिस्सा), गुजरात – २.१ कोटी (९% हिस्सा), पश्चिम बंगाल – १.४ कोटी (६ % हिस्सा), राजस्थान – १.४  कोटी (६% हिस्सा). एकूण शीर्ष पाच राज्यांचा हिस्सा जवळपास ४९ %, तर शीर्ष दहा राज्यांचा एकत्रित हिस्सा ७३ % पेक्षा जास्त आहे.

गुंतवणूकदार शिक्षण आणि बाजारातील वाढती भागीदारी

कोविडनंतर भारतीय भांडवली बाजारात वाढलेल्या गुंतवणूकदार सहभागामुळे गुंतवणूकदारांच्या शिक्षणाची गरज अधिक अनिवार्य बनली आहे.

३० सप्टेंबर २०२५ पर्यंत, थेट गुंतवणूक करणारे व म्युच्युअल फंडांमार्फत गुंतवणूक करणारे अशा सर्व वैयक्तिक गुंतवणूकदारांची एएसई-सूचीबद्ध कंपन्यांमधील हिस्सेदारी १८.७५ % झाली आहे, जी मागील २२ वर्षांतील सर्वाधिक आहे.

गेल्या पाच वर्षांत, निफ्टी ५० ने १५ % वार्षिक परतावा दिला तर निफ्टी ५०० ने १८ % वार्षिक परतावा दिला.

गुंतवणूकदार संरक्षण उपायांचे बळकटीकरण

डिजिटलायझेशन, नवप्रवर्तन, मध्यमवर्गाचा विस्तार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वाखालील प्रगत धोरणांमुळे गुंतवणूकदारांचा विश्वास आणखी वाढला आहे. एनएसई, सेबी आणि सरकारने गुंतवणूकदार जागरूकता व आर्थिक समावेशन यासाठी संयुक्त बांधिलकी अधिक मजबूत केली आहे.

हे ही वाचा:

तोंडातील फोड ते खवखव घशाची… हमखास उपाय घ्या वेलची!

डिजिटल अरेस्टच्या सर्व प्रकरणांची चौकशी करा, बँकांची भूमिका देखील तपासा!

संचार साथी ऍप अनिवार्य नाही!

श्रीलंकेत चक्रीवादळग्रस्तांना मदत पोहोचवत आहे भारताचे आयएनएस विक्रांत

एनएसईचा गुंतवणूकदार शिक्षणातील उपक्रम

आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या सहामाहीत एनएसईने ११,८७५ गुंतवणूकदार जागरूकता कार्यक्रम (IAPs) आयोजित केले. ज्यामध्ये ६.२ लाखांहून अधिक लोक सहभागी झाले. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये संपूर्ण वर्षात १४६७९ कार्यक्रम झाले होते. एनएसईचा गुंतवणूकदार सुरक्षा निधी (आयपीएफ) ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत २७१९ कोटी रुपये झाला असून, वार्षिक वाढ १९ % आहे.

एनएसईचे मुख्य व्यवसाय विकास अधिकारी श्रीराम कृष्णन यासंदर्भात म्हणाले की, रिटेल गुंतवणूकदारांचा भारतीय बाजारांवरील विश्वास सातत्याने वाढत आहे. मोबाइल-आधारित ट्रेडिंगचे प्रमाणिकरण, सुलभ केव्हायसी प्रक्रिया तसेच गुंतवणूकदार जागरूकता उपक्रमांनी सहभाग वाढवला आहे. बदलत्या जागतिक व्यापार आणि भू-राजकीय परिस्थितीतही गुंतवणूकदारांचा सहभाग स्थिर राहिला आहे.

टियर-२, ३आणि ४ शहरांतील गुंतवणूकदारांसाठी बाजार अधिक सुलभ झाला आहे. गुंतवणूकदारांना आता इक्विटी, डेट सिक्युरिटीज, ETFs, REITs, InvITs, सरकारी बाँड्स, कॉर्पोरेट बाँड्स अशा विस्तृत साधनांचा लाभ मिळतो. त्यांनी पुढे सांगितले, या सर्व प्रयत्नांमुळे एनएसईने आणखी एक मोठा टप्पा पार करत नोव्हेंबर २०२५ मध्ये गुंतवणूकदार खात्यांची संख्या २४ कोटींच्या पुढे गेली आहे.”

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
293,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा