29.4 C
Mumbai
Monday, April 21, 2025
घरअर्थजगतभारत यंदा 800 अब्ज डॉलरपेक्षा अधिक निर्यात करणार

भारत यंदा 800 अब्ज डॉलरपेक्षा अधिक निर्यात करणार

केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला विश्वास

Google News Follow

Related

भारत यंदा ८०० अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक निर्यात करण्याच्या मार्गावर आहे, ज्यामध्ये सेवा क्षेत्राचा मोठा वाटा असेल, असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले.

जागतिक बाजारपेठेतील बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार आपल्या निर्यातदारांसाठी चांगले भविष्य सुनिश्चित करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. माल आणि सेवा निर्यातदारांसाठी देशाच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी कोणतीही कसर सोडली जाणार नाही, असा विश्वास केंद्रीय मंत्र्यांनी दिला.

एक्सपोर्ट प्रमोशन काउंसिल (EPC) आणि इंडस्ट्री असोसिएशन्सना संबोधित करताना, मंत्री गोयल यांनी निर्यातदार समुदायाच्या सकारात्मक दृष्टिकोनाचे कौतुक केले. सध्याच्या जागतिक संकटाला संधीमध्ये बदलण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचे त्यांनी अभिनंदन केले.

हे ही वाचा:

पश्चिम बंगालमध्ये हिंदूं देवतांच्या मूर्तींची तोडफोड, भाजपाने व्हिडीओ केला शेअर!

‘पश्चिम बंगाल बनत आहे मिनी काश्मीर’

इंझमाम उल हक म्हणतो, आयपीएलवर बहिष्कार टाका!

संभलमध्ये उत्साहात होळी, कडक सुरक्षा, ड्रोनच्या मदतीने नजर

अमेरिकेशी व्यापार संबंध सुधारण्याबाबत उद्योग क्षेत्राच्या चिंता दूर करताना,  एक्सपोर्ट प्रमोशन काउंसिलला त्यांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन करण्यात आले. अमेरिकेसोबत अधिक चांगला व्यापार-जोड निर्माण करण्यासाठी सरकार पूर्ण सहकार्य देईल.

मुक्त व्यापार करार (FTA) अंतिम टप्प्यात

भारत सध्या अनेक देशांसोबत द्विपक्षीय करारांवर काम करत आहे. काही देशांसोबत मुक्त व्यापार करार (FTA) अंतिम टप्प्यात आहे. हे करार भारतीय निर्यातदारांसाठी नवीन संधी निर्माण करतील आणि परकीय गुंतवणूक वाढवतील.

परस्पर टॅरिफ (मसुदा करार) चर्चांबाबत बोलताना गोयल म्हणाले की, “EPC आणि भारतीय उद्योग क्षेत्राला संरक्षणवादी मानसिकतेतून बाहेर येऊन आत्मविश्वासाने जागतिक बाजारपेठेत प्रवेश करावा लागेल.”

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
243,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा