28.2 C
Mumbai
Thursday, July 16, 2026
घरबिजनेसदिवसभर तेजीचा जल्लोष, अखेरीस नफावसुलीचा ब्रेक

दिवसभर तेजीचा जल्लोष, अखेरीस नफावसुलीचा ब्रेक

बँकिंग समभागांची दमदार कामगिरी, आयटी क्षेत्रावर दबाव

Google News Follow

Related

पाश्चिम आशियातील वाढता तणाव, कच्च्या तेलाच्या चढ्या किमती आणि आयटी क्षेत्रावरील दबाव यामुळे व्यवहारात चढ-उतार दिसून आले. तरीही बँकिंग आणि वित्तीय समभागांच्या जोरावर भारतीय शेअर बाजाराने बुधवारी सकारात्मक शेवट केला. दिवसभरात सेन्सेक्सने सुमारे ६०० हून अधिक अंकांची उसळी घेतली होती, मात्र अखेरच्या सत्रात नफावसुली वाढल्याने बहुतांश वाढ कमी झाली. अखेरीस बीएसई सेन्सेक्स १३०.४९ अंकांनी (०.१७%) वधारून ७७,१८५.४३ वर, तर एनएसई निफ्टी २६.४५ अंकांनी (०.११%) वाढून २४,०७८.५० वर बंद झाला.

दिवसभराच्या व्यवहारात बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा क्षेत्रातील समभागांनी बाजाराला मजबूत आधार दिला. ICICI Prudential Life चा शेअर सुमारे ३.८ टक्क्यांनी वधारला, तर HDFC Life, ICICI Lombard आणि HDB Financial यांच्यातही चांगली खरेदी झाली. तिमाही निकालांच्या अपेक्षेमुळे या क्षेत्रात गुंतवणूकदारांचा उत्साह कायम राहिला.
हे ही वाचा:
माऊलींच्या पादुकांना नीरा स्नान; भक्तिरंगात न्हाऊन निघाले हजारो वारकरी!

सेमिकंडक्टरपासून युरियापर्यंत… मोदी सरकारचे २.१९ लाख कोटींचे मेगा पॅकेज

श्रद्धा वालकरच्या शरीराचे तुकडे अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत…खुनी आफताब मात्र शिकतोय!

नवी मुंबई विमानतळावरून पहिले आंतरराष्ट्रीय विमान अबूधाबीला रवाना

दुसरीकडे, आयटी क्षेत्रावर दबाव कायम राहिला. अमेरिकेतील तंत्रज्ञान कंपनी IBM ने निराशाजनक अंदाज जाहीर केल्यानंतर निफ्टी आयटी निर्देशांक सुमारे ०.७ टक्क्यांनी घसरला. टाटा एल्क्सी चा शेअर तब्बल ४.८ टक्क्यांनी कोसळला, त्यामुळे आयटी समभागांमध्ये विक्रीचा दबाव वाढला.

जागतिक स्तरावर अमेरिकेतील महागाई अपेक्षेपेक्षा कमी राहिल्याने बाजाराला सुरुवातीला सकारात्मक आधार मिळाला. मात्र, ब्रेंट क्रूडची किंमत १ टक्क्यांनी वाढून सुमारे ८५.५ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्याने आणि पाश्चिम आशियातील भू-राजकीय तणाव कायम असल्याने गुंतवणूकदारांनी दिवसअखेरीस नफावसुलीला प्राधान्य दिले.

बाजार विश्लेषकांच्या मते, भारतीय अर्थव्यवस्थेची मूलभूत स्थिती मजबूत असली तरी कच्च्या तेलाच्या किंमती, पाश्चिम आशियातील घडामोडी, परदेशी गुंतवणूकदारांचा कल आणि तिमाही निकाल यावर आगामी काळातील बाजाराची दिशा ठरणार आहे. त्यामुळे अल्पकालीन अस्थिरता कायम राहण्याची शक्यता असून, गुंतवणूकदारांनी दर्जेदार समभागांमध्ये टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
320,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा