29.4 C
Mumbai
Saturday, July 11, 2026
घरक्राईमनामाप्रेयसीवर संशयातून प्रियकराने केली निर्घृण हत्या

प्रेयसीवर संशयातून प्रियकराने केली निर्घृण हत्या

डोंगरावर नेऊन गळ्यावर वार

Google News Follow

Related

प्रेयसीचे दुसऱ्या तरुणाशी संबंध असल्याच्या संशयातून एका २१ वर्षीय तरुणाने आपल्या प्रेयसीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समतानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. आरोपीने तरुणीला गोड बोलून डोंगराळ भागात नेले आणि तेथे तिच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून तिचा खून केल्याचे तपासात समोर आले आहे.

शुक्रवारी सकाळी दामूनगर परिसरामागील डोंगराळ भागात १६ ते १८ वर्षे वयोगटातील अज्ञात तरुणीचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच समतानगर पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. फॉरेन्सिक पथक आणि डॉग स्क्वॉडच्या मदतीने घटनास्थळावरील पुरावे गोळा करण्यात आले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.

तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती तसेच बेपत्ता व्यक्तींच्या नोंदींची पडताळणी केली. त्यातून मृत तरुणीची ओळख निश्चित करण्यात आली. तिच्या नातेवाईकांची चौकशी केल्यानंतर तिचे सूरज मारुती वाघमारे (२१) याच्याशी प्रेमसंबंध असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी संशयिताचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे समोर आले.

हे ही वाचा:

व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; १५ जणांचा मृत्यू

एकेकाळी ‘नकोशी’ असणारी वाघीण बनली गिरडच्या जंगलाची ‘राणी’

भारतीय नौदलाला नवे बळ! अत्याधुनिक ‘आयएनएस महेंद्रगिरी’ ताफ्यात

राम मंदिर गैरव्यवहार प्रकरणी २० जणांना जिल्हा सोडण्यास बंदी

प्राथमिक तपासानुसार, प्रेयसी दुसऱ्या तरुणाशी बोलत असल्याचा संशय आरोपीला होता. याच रागातून त्याने तिला फिरायला नेण्याच्या बहाण्याने डोंगरावर बोलावले. तेथे दोघांमध्ये वाद झाल्यानंतर आरोपीने तिच्या गळ्यावर वार करून हत्या केली आणि घटनास्थळावरून पळ काढला. समतानगर पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे अल्पावधीत आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
320,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा