‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ सध्या चांगलीच चर्चेत असताना आता या योजनेचा लाभ घेणाऱ्या एका लाभार्थीबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यातील महिलांसोबतचं एका बांगलादेशी महिलने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे उघडकीस आले आहे. मुंबई पोलिसांच्या कारवाईमध्ये ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी काही बांगलादेशी नागरिकांसह एका दलाला अटक केली आहे.
राज्यासह देशभरात सध्या बांगलादेशी रोहिंग्यांविरोधात कठोर कारवाई सुरू असून तपासणी केली जात आहे. अटक करण्यात आलेल्या बांगलादेशींवर कारवाई केली जात आहे. यातील अनेक जण बनवत कागदपत्रांच्या आधारे कित्येक वर्षे भारतात राहत असल्याचे समोर येत आहे. अशातच आता एक बांगलादेशी महिलेने बनावट कागदपत्रांच्या सहायाने थेट सरकारी योजनेचा लाभ घेतल्याचे लक्षात आले आहे. दक्षिण मुंबईतील कामठीपुरा परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
हे ही वाचा :
देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात दावोसमधून दुसऱ्या दिवशी १५ लाख कोटींहून अधिकची गुंतवणूक
कपिल शर्मा, राजपाल यादवसह चार कलाकारांना बिष्णोईच्या नावे धमकीचा मेल
गाडीने उडवल्याने ११ जणांचा मृत्यू!
प्रजाकसत्ताक दिनी होणार संविधानाचा जागर
मुंबई पोलिसांकडून पाच बांगलादेशी नागरिकांसह एका दलालाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत संबंधित महिला ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चा लाभ घेत असल्याचे उघड झाले आहे. कागदपत्रे बनवून देण्यामध्ये एका एजंटने मदत केल्याचे समोर येताच त्यालाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. गेल्या महिन्या-दीड महिन्यात मुंबईत गुन्हे शाखेने जवळपास ३० हून अधिक गुन्हे दाखल केले असून सुमारे ५० बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे.







