25 C
Mumbai
Wednesday, October 9, 2024
घरक्राईमनामाआरक्षणाला विरोध करणाऱ्या तरुणाला मराठा आंदोलकांकडून चोप

आरक्षणाला विरोध करणाऱ्या तरुणाला मराठा आंदोलकांकडून चोप

सोलापुरातील घटना; अंगावर ऑईल ओतून केली मारहाण

Google News Follow

Related

राज्यातील मराठा समजाला सरसकट कुणबी दाखले मिळून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू आहे. दुसरीकडे सरकार देखील मराठा आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील असून सरकारकडून मराठा आरक्षण देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. दरम्यान, मराठा समजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध केल्याचा आरोप करत सोलापुरातील प्रताप कांचन या तरुणाच्या अंगावर मराठा कार्यकर्त्यांनी ऑईल टाकून चोप दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठा समजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध केल्याचा आरोप करत सोलापुरातील प्रताप कांचन या तरुणाच्या अंगावर काही मराठा कार्यकर्त्यांनी टाकले. त्यानंतर त्यांनी या तरुणाला चोप दिला. या प्रकरणात मराठा कार्यकर्त्यांच्या विरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. स्वतः प्रताप कांचन याने मराठा कार्यकर्त्यांच्या विरोधत या प्रकरणी फिर्याद दिली आहे. राम जाधव, योगेश पवार, रविकांत पाटील, ओंकार लोखंडे, किरण वाघमारे अशी गुन्हा दाखल झालेल्या कार्यकर्त्यांची नावे आहेत.

हे ही वाचा:

झोपण्याची दोन इंच जागा कमी झाल्याने कैद्यांची न्यायालयात धाव

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ११ निर्णयांना मान्यता!

संगमनेर कारागृहातून चार कैद्यांचे पलायन!

एल्विश यादव प्रकरणाच्या वैदकीय अहवालात धक्कादायक माहिती समोर!

सोलापुरात मराठा आंदोलकांनी प्रताप कांचन या तरुणाला ओबीसी मधून आरक्षण देण्यास तुझा विरोध का? असा जाब विचारला. यावेळी कार्यकर्त्यांनी प्रताप कांचनच्या डोक्यावर ऑइल ओतले. तसेच त्याला चोप ही दिला. आंदोलक तरुणांनी जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हे कृत्य केले. तसेच खिशातून पैसे काढून घेतले, बदनामी केली अशा आशयाची फिर्याद मराठा कार्यकर्त्यांविरोधात देण्यात आली आहे. सोलापुरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्यात पाच आरोपींविरोधात भादवि कलम ३०७, १४३, १४७, १४९, ३२७, ४२७, ५००, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
181,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा