31 C
Mumbai
Saturday, September 26, 2026
घरक्राईमनामामहिलेने तिचा विनयभंग करणाऱ्याला पकडले, दिले पोलिसांच्या ताब्यात

महिलेने तिचा विनयभंग करणाऱ्याला पकडले, दिले पोलिसांच्या ताब्यात

२० वर्षीय तरुणाला विनयभंगाच्या आरोपाखाली अटक

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

ठाण्यासारख्या गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर एका ३१ वर्षीय महिलेचा विनयभंग करून पळून जाण्याऱ्या २० वर्षीय तरुणाला पकडून पोलिसांच्या हवाली केले. अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी बुधवारी दिली. मंगळवारी सकाळी ९.३५ च्या सुमारास ठाणे येथील प्लॅटफॉर्म 10A कडे जाणार्‍या जिन्यावर ही घटना घडली असून अंबरनाथमध्ये राहणारी महिला ऐरोली येथील एमएनसी मध्ये काम करणारी महिला कामावर जात असताना ही घटना घडली.

डीआर साहू असे आरोपीचे नाव असून तो घणसोली येथे राहतो आणि तीन हात नाका येथील एक खासगी कंपनीत काम करतो. संबंधित महिला पायर्‍या उतरत असताना आरोपीला विरुद्ध दिशेने येताना पाहिले होते. गर्दीचा फायदा घेत आरोपीने अयोग्यरित्या स्पर्श केला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावध दाखवत त्या महिलेने आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले अशी माहिती ठाणे रेल्वे स्थानकावरील वरिष्ठ निरीक्षक पंढरी कांदे यांनी दिली.

हे ही वाचा : 

‘या’ दिवशी पंतप्रधान मोदींच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे उद्घाटन

अखेर इराणने हिजाब कायदा बदलण्याचा घेतला निर्णय

जुळ्या बहिणींशी लग्न करणं तरुणाला भोवणार

‘पंतप्रधान मोदी सर्व देशांना एकत्र आणतील’

त्यानंतर सहप्रवाशांनी ड्यूटीवर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला सावध केले व आरोपीला पकडून पोलिस ठाण्यात आणले तसेच महिलेने गुन्हा दाखल केल्यानंतर विनयभंगाच्या आरोपाखाली त्या तरुणाला अटक करण्यात आली. संबंधित आरोपीविरुद्ध आणखी पुराव्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. त्या तरुण आरोपीवर यापूर्वी अशाच प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत का हे जाणून घेण्यासाठी पोलिस या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करीत आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
335,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा