34 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरदेश दुनियाअखेर इराणने हिजाब कायदा बदलण्याचा घेतला निर्णय

अखेर इराणने हिजाब कायदा बदलण्याचा घेतला निर्णय

Google News Follow

Related

इराणमध्ये हिजाबविरोधात गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. मात्र, आता इराणचे इस्लामी सरकार जनतेच्या मागणीपुढे गुडघे टेकण्याच्या तयारीत आहे. इराण सरकारने हिजाब कायदा बदलण्याची तयारी दर्शवली आहे.

इराणमध्ये हिजाब घालणे आवश्यक आहे. तसे न केल्यास संबंधित महिलेवर कारवाई होते. त्यानुसार शरिया-आधारित हिजाब कायद्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी कुर्द वंशाच्या २२ वर्षीय इराणी महसा अमिनी या तरुणीला अटक केली होती. पोलीस कोठडीमध्ये असताना १६ सेप्टेंबर रोजी महसा अमिनीचा मृत्यू झाला आणि तिच्या मृत्यूनंतर इराणमध्ये निदर्शने सुरु झाली. गेल्या दोन महिन्यांपासून इराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलन सुरु आहे. इराणमध्ये हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नव्हत्या. गेल्या दोन महिन्यांपासून देशात सुरू असलेल्या निदर्शनांमध्ये किमान ३४४ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर १५ हजार ८२० लोकांना अटक करण्यात आली आहे.

इराणमध्ये या चळवळीचे नेतृत्व मुली करत आहेत. देशभरात ठिकठिकाणी आंदोलकांचे गट एकत्र येत आहेत आणि सरकारविरोधी घोषणा देत आहेत. अमिनच्या मृत्यूनंतर सुरु झालेली ही चळवळ केवळ इराणमध्ये नाही तर इतर अनेक देशांमध्येही पोहचली होती.

हे ही वाचा : 

जुळ्या बहिणींशी लग्न करणं तरुणाला भोवणार

ईडीकडून अकरा कोटींची सुपारी जप्त

व्यवसायातील नुकसानीमुळे ताज हॉटेलच्या १०व्या मजल्यावरून त्याने मारली उडी

जुळ्या बहिणींचा नवरा मात्र एकच! आहे की नाही कमाल?

हिजाबविरोधी आंदोलन इराणमध्ये दिवसेंदिवस तीव्र होत गेले. अखेर दोन महिन्यांनी इराणचे ऍटर्नी जनरल मोहम्मद मोंटाजेरी यांनी हिजाब कायद्याबाबत विचार करत असल्याचे सांगितले आहे. संसद आणि न्यायव्यवस्था या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यासंदर्भात घेतलेले निर्णय पुढच्या एक दोन आठवड्यात कळतील, अशी माहिती त्यांनी दिली आहे. मात्र, ऍटर्नी यांनी या कायद्यात कोणते बदल केले जाणार हे स्पष्ट केलेले नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा