30 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
घरविशेषजुळ्या बहिणींशी लग्न करणं तरुणाला भोवणार

जुळ्या बहिणींशी लग्न करणं तरुणाला भोवणार

या नवदाम्पत्याच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Google News Follow

Related

सोलापूरमधील अकलूज येथे पार पडलेल्या विवाह सोहळ्याची चर्चा सगळीकडे रंगली होती. नवरदेवाने एकाच मंडपात दोन जुळ्या बहिणींशी लग्न केले आहे. सोशल मीडियावर या अनोख्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. परंतु, या दोन वधूंच्या नवरदेवाला हे लग्न भोवणार असल्याचं दिसत आहे. कारण एका तरुणाने या प्रकरणी तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केल्याची माहिती आहे.

नवरदेव अतुल अवताडे हा माळशिरस तालुक्यातील महाळुंग येथील रहिवासी असून तो त्याचा मुंबईत ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. मुंबईत इंजिनियरींगचे शिक्षण घेऊन नोकरी करणाऱ्या रिंकी पाडगावकर आणि पिंकी पाडगावकर या जुळ्या बहिणीशी अतुलने विवाह केला. कुटुंबियांच्या सहमतीनेच हा विवाह झाला असून अकलुजमध्ये हे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले.

मात्र, लग्नसोहळा पार पडल्यानंतर राहुल फुले नावाच्या तरुणाने या जोडप्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. भारतीय दंड संहितेच्या ४९४ कलमानुसार पोलिसांनी या प्रकरणात पीसीआर दाखल केला असून लवकरच प्रकरणाची चौकशी करून कारवाई केली जाणार असल्याची माहिती आहे.

हे ही वाचा : 

ईडीकडून अकरा कोटींची सुपारी जप्त

व्यवसायातील नुकसानीमुळे ताज हॉटेलच्या १०व्या मजल्यावरून त्याने मारली उडी

जुळ्या बहिणींचा नवरा मात्र एकच! आहे की नाही कमाल?

‘माझे ठाणे’ ही भावना मनात ठेवून काम करा!

दरम्यान, रिंकी आणि पिंकी या दोन्ही बहिणी आयटी कंपनीत नोकरीस आहेत. दोघींचे शिक्षणही एकत्र झालेले आहे. जुळ्या असल्यामुळे एकत्रच त्यांचे संगोपन झाले. एकमेकांची त्या दोघींनी इतकी सवय आहे की, त्यांनी एकाच वराशी विवाह करण्याचे ठरविले. दोघी एकमेकांशिवाय राहू शकत नसल्याने त्या वेगवेगळे विवाह करण्यासही तयार नव्हत्या त्यामुळे त्यांनी अतुल या वराशीच लग्न केले आहे. मात्र, आता या नवदाम्पत्याच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा