28 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरक्राईमनामाश्रद्धा हत्या प्रकरण उघडकीस आल्यापासून आफताबचे कुटुंब गायब

श्रद्धा हत्या प्रकरण उघडकीस आल्यापासून आफताबचे कुटुंब गायब

आफताबचे कुटुंब गेल्या वीस वर्षपासून वसईमध्ये राहत होते.

Google News Follow

Related

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येतं आहे. हा हत्याकांड मुंबई, दिल्लीसह संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. सध्या या हत्याकांडाप्रकरणी श्रद्धाचे कुटुंबीय पोलिसांना सहकार्य करत आहे. तिच्या वडिलांनीसुद्धा अनेक खुलासे केले आहेत. मात्र, आरोपी आफताबचे कुटुंबीय हत्याकांड उघड झाल्यापासून गायब आहे. त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही. आफताबचे कुटुंब गायब असल्याने त्याच्या कुटुंबियांना हत्याकांडाबाबत कल्पना होती अशी शक्यता पोलीस व्यक्त करत आहेत.

आफताबचे कुटुंब गेल्या वीस वर्षपासून वसईमध्ये राहत होते. अचानक ११ नोव्हेंबर रोजी श्रद्धाच्या हत्येचे प्रकरण उघडकीस येण्याच्या दोन आठवड्यांपूर्वी संपूर्ण कुटुंब वसई सोडून गेले होते. आफताबने त्यांना वसईतून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यास मदत केली अशी माहिती श्रद्धाचे वडील विकास यांनी दिली आहे. आफताबच्या कुटुंबियांनी वसईतील घर सोडताना त्यांच्या इमारतीतील लोकांना ते मुंबईत शिफ्ट होत असल्याचे सांगितले होते. आफताबच्या लहान भावाला मुंबईत नोकरी मिळाल्याचे सांगत त्यांनी वसई सोडले होते. आफताबचे वडील अमीन पूनावाला मुंबईतील कांदिवली-मालाड भागात चपलांचे पुरवठादार आहेत. हत्याकांड उघडकीस आल्यापासून त्याच्या कुटुंबियांशी काहीही संपर्क होऊ शकलेला नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताबला अटक केल्यापासून त्याचे वडील अमीन दिल्लीत आहेत.

हे ही वाचा : 

‘पुन्हा सत्तेत येण्यासाठी पदयात्रा काढत आहेत’

हिजाबविरोधाच्या समर्थनार्थ इराण फुटबॉल संघाने टाळले राष्ट्रगीत

कतारमधील फुटबॉल वर्ल्डकपमध्ये वादग्रस्त झाकीर नाईक करणार इस्लामचा प्रचार

त्याच्यासाठी तरी राहुल गांधी ‘पंतप्रधान’ होतील?

दरम्यान, श्रद्धाची आई आजारी असताना तिची शेवटची इच्छा होती की, तिला जीवंतपणी आपल्या मुलीचं लग्न पाहायचं होतं. यासाठी श्रद्धा आणि आफताबच्या लग्नाची इच्छा नसतानाही श्रद्धाचे वडील आफताबच्या घरी गेले होते. डिसेंबर २०१९ मध्ये आफताबच्या घरी लग्नाची मागणी घेऊन पोहोचले होते, पण आफताबचा लहान भाऊ असद याने त्यांना घरात घेण्यास नकार दिला. यात पुढे श्रद्धाच्या आईचा मृत्यू झाला आणि काही दिवसांनी श्रद्धा आणि आफताब दिल्लीला स्थलांतर झाले. श्रद्धाची निघृण हत्या झाली असताना आफताबचे कुटुंब गायब असणं, या गोष्टीबाबत श्रद्धाचे वडील आश्चर्य व्यक्त करत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा