34 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरक्राईमनामा'एसआरए' योजनेतील फ्लॅट एजंटने परस्पर दुसऱ्याला विकले

‘एसआरए’ योजनेतील फ्लॅट एजंटने परस्पर दुसऱ्याला विकले

फ्लॅट हे लॉटरी पद्धतीने अगोदरच विकले गेले होते.

Google News Follow

Related

स्वप्नांच्या मायानगरीत स्वतःचे एक घर असावे, अशी सर्वसामान्य नागरिकाची अपेक्षा असते. हीच अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ‘म्हाडा’ किंवा ‘एसआरए’ योजनेतील घर स्वस्तात मिळतील ही आशा नागरिक ठेवतो. पुढे कुठल्यातरी एजंटला गाठून आपल्या स्वप्नातील घर कमी पैशात मिळेल म्हणून एजंट बोलेल ती पूर्व दिशा असे, मानून कोणतीही खातरजमा न करता परस्पर पैसे देवून टाकणे. नंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येते. अशीच एक घटना उत्तर मुंबईतील कुरार भागात घडली आहे. ‘एसआरए’ योजनेंतर्गत बांधलेल्या इमारतीमधील दोन फ्लॅट देतो असे सांगून ४७ लाख रुपये लाटल्याची घटना उघड झाली आहे. पिडीत व्यक्तीने एजंट विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार केली असून, पोलिसांनी एजंट विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कुरार येथे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत ‘माऊली प्राइड’ इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. सदर इमारत ही पश्चिम द्रुतगती महमार्गालगत आहे. त्याच इमारतीच्या परिसरात जनरल स्टोअर चालवणारी एक महिला घराच्या शोधात होती. त्याच वेळी तिच्या परिचयातील एक व्यक्तीने एजंट सोबत संपर्क साधून दिला. या महिलेने एजंटकडे आणखी माहिती काढल्यानंतर २३ लाख ५० हजार रुपयांमध्ये तिसऱ्या मजल्यावर फ्लॅट विकणार असल्याचे समजले. फ्लॅटची खातरी न करता या महिलेने फ्लॅट घेण्यासाठी सहमती दर्शवली.

महिलेने थोडे-थोडे करून आपल्या कष्टाचे पैसे एजंटकडे सोपवले. त्यानुसार एजंटने करारनामा व खरेदीबाबत खोटी कागद पत्रे आणि फ्लॅटची चावी तयार करून त्या महिलेकडे सोपविली. संबंधित महिलेने फ्लॅटचा ताबा घेण्यासाठी चावीचा वापर केला असता, दरवाजा उघडला नाही. त्यावेळी महिलेने एजंटकडे याबबत तक्रार केली तर एजंट उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यानंतर महिलेने इमारत बांधलेल्या बिल्डरकडे चौकशी केली. सदर फ्लॅट हा लॉटरी पद्धतीने अगोदरच विकला गेला असल्याची माहिती त्या महिलेला मिळाली.

हे ही वाचा:

बेंगळुरूतील स्फोटाचा मास्टरमाइंड शरीक ISIS शी संबंधित

श्रद्धाच शीर मैदान गढीतील तलावात, आरोपीची कबुली

नवले पुलावर झालेल्या अपघाताचं कारण आलं समोर

‘शिवाजी महाराजांनी माफी मागितली होती, असे वक्तव्य सुधांशू त्रिवेदींनी केलेलेच नाही’

संबंधित महिलेला आपली फसवणूक झाल्याचे हे लक्षात येताच कुरार पोलिस ठाणे गाठले. त्याच वेळी आणखी एक व्यक्ती एजंट आणि त्याच्या साथीदारांनी चौथ्या मजल्यावर फ्लॅट देतो सांगून २३ लाख ५० हजार रुपये उकळले होते. दोघांच्या तक्रारीवरून कुरार पोलिसांनी एजंट आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा