33 C
Mumbai
Thursday, May 16, 2024
घरक्राईमनामापटनात जामा मशिदीबाहेर अतिक अहमद अमर रहेचे नारे!

पटनात जामा मशिदीबाहेर अतिक अहमद अमर रहेचे नारे!

वातावरण पेटविण्याचा केला प्रयत्न

Google News Follow

Related

१५ एप्रिल रात्री १०.३५ च्या सुमारास प्रयागराजमधील केल्विन हॉस्पिटलबाहेर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची तिघांनी गोळ्या झाडून हत्या केली. या अगोदर उमेश पाल हत्याकांडात अतिकच्या मुलाचा आणि त्याच्या साथीदाराचा पोलीस चकमकीत एन्काउंटर झाला. अतीकचा दफनविधी पार पडला असला तरी वातावरण शांत झालेले नाही. बिहारची राजधानी पटना येथे शुक्रवारी काही समाजकंटकांनी मशिदीबाहेर अतिक अहमद अमर रहे अशा घोषणा देत पुन्हा या घटनेला पेटवण्याचे काम केले आहे.

यापूर्वी काँग्रेसच्या एका नेत्याने उत्तर प्रदेशातील अतीक अहमदच्या कबरीवर तिरंगा फडकावला होता आणि त्याला शहीद घोषित करण्याची मागणी केली होती. त्यानंतर काँग्रेसने त्याची पक्षातून हकालपट्टी केली होती. पटना रेल्वे स्थानकाजवळील प्रसिद्ध जामा मशीद येथे काही लोक नमाज पढत होते.नमाज झाल्या नंतर त्यातल्या काही समाजकंटकांनी अतीक अहमदच्या समर्थनार्थ घोषणा देण्यास सुरुवात केली. ‘शहीद अतीक अहमद अमर रहे’च्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी शेकडो मुस्लिमांची गर्दी रस्त्यावर जमलेली दिसली.

हे ही वाचा:

अदानीविरोधकांना हादरा, गौतम अदानींनी घेतली शरद पवारांची भेट

महाराष्ट्र का म्हणतोय, बरे झाले ठाकरे गेले???

राहुल गांधी यांना धक्का, मानहानीबद्दल झालेली शिक्षा कायम

आर्थिक मदतीसाठी येमेनमध्ये झाली तुफान चेंगराचेंगरी; ८० पेक्षा जास्त लोक ठा

नमाज अदा करून मशिदीतून बाहेर आलेल्या मुस्लिमांनी अतीक अहमद यांना हुतात्मा म्हटले आणि जगभरातील मुस्लिमांच्या नजरेत अतीक आणि अशरफ शहीद झाल्याचे सांगितले. माफियांच्या समर्थनार्थ घोषणा देणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही शिव्या देत होते. यावेळी हे सर्व पाहण्यासाठी स्टेशनच्या जामा मशिदीबाहेरही वातावरण अचानक बदलल्याने मोठी गर्दी जमली होती. या घटनेनंतर भाजपने संताप व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे हे सर्व घडत आहे, अशी टीका भाजपचे प्रवक्ते अरविंद सिंह यांनी केली. त्यामुळेच पाटण्यात अतीक अहमद अमर रहे यासारख्या घोषणा देण्यात आल्याचा आऱोप करण्यात आला. या घोषणाबाजीनंतर भाजपने नितीशकुमार यांच्यावर जोरदार हल्ला चढविल्याचे स्पष्ट झाले आहे.
या अगोदरही महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे चौकात बॅनर लावण्यात आले होते. अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ दोघांचा शहीद उल्लेख करण्यात आला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली. तसेच हे बॅनर तात्काळ हटवण्यात आले.

मोहसीन भैय्या मित्र मंडळाकडून हा बॅनर लावण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. तर या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, मोहसीन पटेलचा पोलीस शोध घेत आहेत.तर या बॅनरच्या विरोधात विश्व हिंदू परिषदेकडून माजलगाव शहरात मोर्चा काढत निदर्शने करण्यात आली आहेत. दरम्यान यावेळी अतिक अहमद संदर्भात मजकूर असलेले बीडमधील एक वृत्तपत्र, जाळून निषेध व्यक्त करण्यात आलाय.
खरंतर महाराष्ट्राशी किंवा बीडशी या घटनेचा तीळमात्र सबंध नाही. तरीदेखील माजलगावातल्या काही तरुणांनी हे बॅनर लावून तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे.

कोण होता अतिक अहमद ?

अतिक अहमदचा जन्म १० ऑगस्ट १९६२ रोजी झाला. अतिकचे वडील फिरोज अहमद आपल्या कुटुंबासह अलाहाबादच्या चकिया परिसरात राहत होते. ते आपला उदरनिर्वाह करण्यासाठी टांगा चालवत असत.अतिकला शिक्षणाची फारशी आवड नव्हती. त्याने १९७९ मध्ये वयाच्या १८ व्या वर्षी पहिला खून करत गुन्हेगारी विश्वात पाऊल ठेवले.२१-२२ व्या वर्षी अतिक अलाहाबादमधील चकियाचा परिसरात मोठा गुंड बनला होता. तसेच त्याने खंडणीचा धंदा सुरू केला होता.

पुढे अतिक अहमद गुन्हेगारीच्या जगातून राजकारणाकडे वळला. १९८९मध्ये अतिकने अलाहाबाद पश्चिम मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्याचा विजय झाला.त्यानंतर याच जागेवर त्याने सपा आणि अपना दलाच्या तिकीटांवरही निवडणूक लढवली.अतिकने २००४ साली फुलपूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली. याच जागेवरून पंडित नेहरू यांनीही निवडणूक लढवली होती.२००७ मध्ये त्याने समाजवादी पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढवली, मात्र, त्याचा पूजा पाल यांनी पराभव केला.

गुंड अतिक अहमद हा २००५ मधील बसपा आमदार राजू पाल हत्याकांड आणि फेब्रुवारीमध्ये झालेल्या उमेश पाल हत्याकांडातील प्रमुख आरोपी होता.अतिक अहमदवर उत्तर प्रदेशमध्ये १०० पेक्षा जास्त गुन्ह्यांची नोंद आहे. यामध्ये खून, खंडणी अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे.पुढे उमेश पाल हत्याकांडात त्याला अटक करण्यात आली. तसेच त्याला २८ मार्च रोजी दोषी ठरवण्यात आले. दरम्यान, शनिवारी त्याला वैद्यकीय तपासणीसाठी नेत असताना त्याची हत्या करण्यात आली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा