33 C
Mumbai
Thursday, May 16, 2024
घरराजकारणआपल्या पूर्वजांची पापे लपविण्यासाठी सावरकरांवर चिखलफेक

आपल्या पूर्वजांची पापे लपविण्यासाठी सावरकरांवर चिखलफेक

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांचा घणाघात

Google News Follow

Related

आज देशातील काही लोक जाणीवपूर्वक सावरकरांवर अश्लाघ्य भाषेत टीका करत आहेत, कारण त्यांनी भीती आहे की, त्यांच्या पूर्वजांनी केलेली पापे लोकांसमोर येऊ शकतील. ती पापे झाकण्यासाठीच सावरकरांवर ही चिखलफेक सुरू आहे, अशा शब्दांत स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू आणि स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी सावरकरद्वेष्ट्यांवर घणाघात केला.

ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांनी अनुवादित केलेल्या वीर सावरकर फाळणी रोखण्याची क्षमता असलेला महापुरुष या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी रणजित सावरकर यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली.

ते म्हणाले की, क्रांतिकारकांना विशेषतः सावरकरांनी हे ठरवले होते की, तुरुंगात खितपत पडण्यापेक्षा बाहेर पडून आपण देशाच्या स्वातंत्र्यासाठी काहीतरी केले पाहिजे. सावरकरांनी इंग्रजांना विनंती करणारे पत्र लिहिले होते तो माफीनामा नव्हता. कारण इंग्रजांनी स्वतःहून म्हटलेले आहे की, सावरकरांनी आपल्या या विनंती पत्रांच्या माध्यमातून माफी मागितलेली नाही. असा अर्ज भगतसिंह, गांधीजींनीही दिला होता.

हे ही वाचा:

मराठा आरक्षणाबाबत सरकार जाणार सर्वोच्च न्यायालयात

अहो, उद्धव ठाकरे, तुमची ब्लू टीक नऊ महिन्यांपूर्वीच गेली…

शिर्डी संस्थानच्या नाण्यांचा ढीग ठरला, बँकांसाठी समस्येचा डोंगर!

ट्विटरची ब्ल्यू टिक हरवली, आम्हाला नाही मिळाली!

रणजित सावरकर यांनी सांगितले की, १९२१ मध्ये गांधीजींनी एक आंदोलन घेतले. त्याला मुस्लिमांचे समर्थन नव्हते. त्याचवेळी परदेशातून अनेक भारतीय क्रांतिकारकांनी पंजाबमध्ये एकत्र येत विद्रोह केला. त्यावेळी जनरल डायरने विमानातून त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव केला होता. त्यानंतर डायर स्वतः म्हणाला होता की, हा गोळीबार करून आपण ब्रिटिश साम्राज्याला वाचविले आहे. अन्यथा १८५७पेक्षा अधिक मोठा असा उद्रेक झाला असता. गांधीजींनी आपले आंदोलन मागे घेतल्यावर मात्र डायरने गोळीबार केल्याचा उल्लेखही केला नाही. उलट क्रांतिकारकांनी इंग्रज अधिकाऱ्याला मारल्यावर त्यांनी क्रांतिकारकांना बदनाम केले. गांधीजींनी खिलाफत आंदोलन सुरू केले ज्याचा भारतीय मुस्लिमांशी कोणताही संबंध नव्हता. त्यानंतर भारतातील मुस्लिमांनी एक धार्मिक उन्माद सुरू केला.

सावरकर यांनी सांगितले की, स्वातंत्र्यपूर्व काळात सावरकरांनी व्यक्त केलेल्या विचारांवर अंमल केला गेला असता तर या पुस्तकाचे शीर्षक वीर सावरकर द ग्रेट मॅन असे असते. देश पुन्हा एकदा विभाजनाच्या उंबरठ्यावर आहे, अशा वेळी सावरकरांच्या त्या विचारांवर अंमल करण्याची गरज आहे. तर भारत विश्वात आर्थिक महासत्ता बनू शकेल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा