30 C
Mumbai
Wednesday, July 17, 2024
घरक्राईमनामाहोमस्टेमधील एका महिला कर्मचाऱ्याला दारू पाजून केला सामूहिक बलात्कार!

होमस्टेमधील एका महिला कर्मचाऱ्याला दारू पाजून केला सामूहिक बलात्कार!

आग्रा येथील घटना, ५ जणांना अटक

Google News Follow

Related

आग्रा येथील एका होमस्टेमध्ये काम करण्याऱ्या तरुणीला दारू पाजून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.पीडित महिला एका हॉटेलमध्ये कर्मचारी असून ती तिथे दीड वर्षांपासून काम करते.या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पीडित महिला मदतीची याचना करताना दिसत आहे.

पीडित महिलेने पोलिसांना सांगितले की, तील तिच्या मित्राने आणि काही इतरांनी दारू पिण्यास भाग पाडले आणि एका खोलीत ओढले.जेव्हा तिने विरोध दर्शविला तेव्हा काही पुरुषांनी तिला मारहाण केली. तसेच तिच्या डोक्यावर काचेची बाटली फोडण्यात आली होती.

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हेगारांविरोधात भारतीय दंड संहितेच्या (IPC) अंतर्गत बलात्कार, प्राणघातक हल्ला आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी पोलिसांनी चार पुरुष आणि एका महिलेला अटक केली आहे.बलात्कार पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.ती होमस्टेमध्ये कर्मचारी होती आणि दीड वर्षांपासून तिथे काम करत होती.या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.या व्हिडिओमध्ये महिला आपली आपबिती सांगत असून मदतीची याचना करत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ती म्हणत आहे की, “कृपया मला मदत करा!”,मला एका माणसाने खोलीत ओढले.व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पीडित महिला जमिनीवर पडलेल्या अवस्थेत दिसत आहे आणि काही पुरुषांनी तिचा छळ केला असा आरोप करत आहे.दुसर्‍या व्हिडिओमध्ये, ती महिला असे म्हणताना ऐकू येते की तिच्या आधी बनवलेल्या आक्षेपार्ह व्हिडिओवरून तिला ब्लॅकमेल केले जात आहे.

हे ही वाचा.. 

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी आठ संघ झाले पात्र

राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर अयोध्या स्थानकाचाही कायापालट

उत्तराखंडमध्ये निर्माणाआधीच बोगदा कोसळला, ३६ जण अडकल्याची भीती!

संयुक्त राष्ट्रांत पहिल्यांदाच भारताचे इस्रायलविरोधात मत!

ती पुढे म्हणते, “कृपया मला वाचवा! मला चार मुली आहेत. त्यांनी मला ओढून नेले, माझा फोन काढून घेतला. ते माझा व्हिडिओ वापरून मला ब्लॅकमेल करत आहेत. त्यांनी माझ्याकडून पैसेही घेतले आहेत,” असे तिने व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकारी सदर अर्चना सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, आग्रा येथील ताजगंज पोलिसांना हॉटेलमध्ये बलात्कार झाल्याची माहिती मिळाली होती.पीडितेच्या आरोपाची दखल घेत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी रात्री ही घटना घडल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.घटना घडलेल्या ठिकाण जे होमस्टे आहे ते सील करण्यात आल्याचे, पोलिसांनी सांगितले.

अधीकारी म्हणाले, “शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास आम्हाला पीडितेचा फोन आला, ज्यामध्ये महिला मदतीसाठी आरडाओरड करत होती.आम्ही होमस्टेवर धाव घेतली आणि आरोपीवर कारवाई केली. पीडितेचे वय सुमारे २५ वर्षे असून ती होमस्टेवर काम करते, असे बसई पोलिस चौकीचे प्रभारी मोहित शर्मा यांनी सांगितले.”तिने आम्हाला बलात्कार झाल्याची संपूर्ण घटना सांगितली आणि आरोपींनी तिला मारहाण केल्याचे सांगितले. त्यांनी तिच्या डोक्यावर काचेची बाटलीही फोडली होती. तिला दारू पिण्यास भाग पाडले होते,” ते पुढे म्हणाले. महिलेने पोलिसांना सांगितले की, तिला जबरदस्तीने खोलीत डांबून ठेवले आणि अमानुषपणे मारहाण केली. तसेच आरोपींनी तिला दारू पिण्यास भाग पाडले.याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
164,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा