27 C
Mumbai
Wednesday, February 4, 2026
घरक्राईमनामागोव्यातील नाईट क्लबचा सह-मालक अजय गुप्ताला अटक

गोव्यातील नाईट क्लबचा सह-मालक अजय गुप्ताला अटक

दिल्लीतून घेतले ताब्यात

Google News Follow

Related

गोवा पोलिसांनी ‘बर्च बाय रोमियो लेन’ नाईट क्लबच्या चार सह-मालकांपैकी एक अजय गुप्ता याला ताब्यात घेण्यात आले आहे. या आगीत २५ जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेपासून फरार असलेल्या गुप्ताविरुद्ध लूक-आउट सर्क्युलर जारी झाल्यानंतर त्याला दिल्लीतून ताब्यात घेण्यात आले आहे. नाईटक्लबच्या मालकांपैकी एक अजय गुप्ता याला ताब्यात घेतले असून या प्रकरणात अटक करण्यात आलेला तो सहावा व्यक्ती आहे, अशी माहिती गोवा पोलिसांनी दिली आहे.

दिल्लीतील अजय गुप्ता याच्या निवासस्थानी पोलिस पथकाला त्याचा शोध घेण्यात अपयश आल्यानंतर त्याच्याविरुद्ध लूक-आउट सर्क्युलर जारी करण्यात आला होता. गुप्ता याला गोव्यात आणण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना औपचारिकपणे अटक केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. गुप्ता याला मंगळवारी संध्याकाळी लाजपत नगर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर गोवा पोलिसांनी गुप्ता याला ताब्यात घेतले. यानंतर त्याला न्यायालयात हजर केले जाईल आणि त्यानंतर ट्रान्झिट रिमांडवर गोव्यात नेले जाईल अशी शक्यता आहे.

हे ही वाचा:

मायक्रोसॉफ्ट भारतात १.५ लाख कोटी रुपये गुंतवणार

पाच दिवसात ‘धुरंधर’ने कमावले १५० कोटी

बडतर्फ शिपाई आलोक सिंह, अमित सिंह टाटाला न्यायालयीन कोठडी

नड्डा शिमलामध्ये पक्ष कार्यालयाची पायाभरणी करणार

७ डिसेंबर रोजी लागलेल्या आगीनंतर पोलिसांनी नाईटक्लबचे मुख्य महाव्यवस्थापक राजीव मोडक, महाव्यवस्थापक विवेक सिंग, बार व्यवस्थापक राजीव सिंघानिया, गेट व्यवस्थापक रियांशु ठाकूर आणि कर्मचारी भरत कोहली यांना अटक केली आहे. आणखी एक सह-मालक सुरिंदर कुमार खोसला यांच्याविरुद्धही लूक-आउट सर्क्युलर जारी करण्यात आला आहे, तर आणखी दोन मालक, सौरभ आणि गौरव लुथरा हे थायलंडमधील फुकेत येथे पळून गेले आहेत. दोघांविरुद्ध ब्लू कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
290,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा