34 C
Mumbai
Saturday, June 3, 2023
घरक्राईमनामापासपोर्ट मिळाला नाही..अमृतपाल परदेशात पलायन करणार ?

पासपोर्ट मिळाला नाही..अमृतपाल परदेशात पलायन करणार ?

Google News Follow

Related

खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंगला पकडण्यात पंजाब पोलिसांना अद्याप पकडण्यात यश आलेले नाही. अमृतपालला पकडण्यासाठी पोलीस सातत्याने छापेमारी करत असून त्याच्या सहकाऱ्यांना अटक करून चौकशी करत आहेत. तरी पोलिसांच्या हाती काहीही लागलेले नाही. त्यामुळे पोलीस विभागासह सर्वांनाच धक्का बसला आहे. गुरुवारी पोलीस अधिकारी खलिस्तानी समर्थक अमृतपालच्या घरी जाऊन धडकले . पोलिसांनी त्याच्या घराची झडती असता अमृतपालचा पासपोर्ट सापडला नाही. अमृतपालचा पासपोर्ट पोलिसांना न मिळाल्याने आता तो परदेशात पळून जाण्याच्या प्रयत्नात असल्याची शक्यता पंजाब पोलिसांनी व्यक्त केली आहे.

पोलीस सतत अमृतपालच्या कुटुंबीयांना अमृतपालला आत्मसमर्पण करण्यास सांगावे असे सातत्याने सांगत होते. पण अमृतपालचे कुटुंबीयही मदत करत नाहीत असे पोलीसांचंही म्हणणे आहे.  अमृतपाल २० मार्चपर्यंत त्याच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत असल्याचीही माहिती आहे. अमृतपालच्या घरातून त्याचा पासपोर्ट न मिळाल्याने सुरक्षा यंत्रणांची चिंता आता वाढली आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय अमृतपालला मदत करू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग पंजाब, राजस्थान, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरमध्ये कुठेही लपून बसू शकतो. पंजाब पोलिसांनी या सर्व राज्यांना अलर्ट पाठवला आहे. अमृतपाल परदेशात पळून जाऊ नये म्हणून पाकिस्तान आणि नेपाळला लागून असलेल्या सीमेवर बीएसएफ आणि एसएसबीला आधीच सतर्क करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

अमृतपाल सिंहचे काय झाले? न्यायालयालाही पडलाय प्रश्न…

आशियातील सर्वात मोठी दुर्बीण उत्तराखंडमध्ये

आज हुतात्मा दिन! याच दिवशी दिली होती भगत, सिंह, राजगुरू, सुखदेव या क्रांतीकारकांना फाशी

अमृतपाल सिंहचे काय झाले? न्यायालयालाही पडलाय प्रश्न…

उत्तराखंडमध्ये लपल्याची माहिती समोर
फरारी अमृतपालच्या शोधात अनेक राज्ये सतर्क आहेत. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आता तो उत्तराखंडमध्ये लपल्याची माहिती समोर आली आहे, त्यानंतर उत्तराखंडमध्ये शोध सुरू झाला आहे. त्याच्या पत्नीची चौकशी करण्यात आली असून त्याला आश्रय देणाऱ्या महिलेलाही अटक करण्यात आली आहे अमृतपाल सिंगची पत्नी किरणदीप कौर आता कट्टरपंथी संघटना वारिस पंजाब देसाठी विदेशातून निधी गोळा केल्याप्रकरणी पंजाब पोलिसांच्या रडारवर आहे. किरणदीप कौर सध्या अमृतपाल सिंग यांच्या मूळ गावी अमृतसर जिल्ह्यातील जल्लूपूर खेडा येथे राहत आहे. दीप सिद्धूने स्थापन केलेल्या संघटनेला पाठिंबा देण्याच्या भूमिकेबद्दल पोलिसांनी त्यांची अनेकवेळा चौकशी केली आहे..

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,851चाहतेआवड दर्शवा
2,022अनुयायीअनुकरण करा
76,300सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा