34 C
Mumbai
Saturday, June 3, 2023
घरदेश दुनियाआशियातील सर्वात मोठी दुर्बीण उत्तराखंडमध्ये

आशियातील सर्वात मोठी दुर्बीण उत्तराखंडमध्ये

अवकाशातील रहस्ये उलगडणार भारतामधल्या खगोलप्रेमींना आता अवकाशाचा अभ्यास करणे आता सोपे होणार आहे.

Google News Follow

Related

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज उत्तराखंडमध्ये देवस्थळ इथे आशियामधल्या सर्वात मोठ्या चार मीटर इंटरनॅशनल लिक्विड मिरर टेलिस्कोपचे म्हणजेच दुर्बिणीचे उदघाटन केले आहे. यावेळी उत्तराखंडाचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल निवृत्त गुरमीत सिंह हे सुद्धा उपस्थित होते. उदघाटनानंतर डॉ. जितेंद्र सिंह बोलताना म्हणाले कि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले प्रोत्साहन, बळ आणि प्राधान्यामुळे वैज्ञानिकांना विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाचे एकामागून एक, जागतिक दर्जाचे मानांकन मिळवणारे उपक्रम राबवण्यासाठी अत्यंत सक्षम बनवल्यामुळे उत्साह आला आहे.

या ऐतिहासिक घटनेमुळे आज अवकाश आणि खगोल शास्त्रीय रहस्यांचा अभ्यास करण्यासाठी नवीन क्षमतांच्या उंचीवर नेऊन पोचवले आहे. असेही सिंह पुढे म्हणाले. ए आर आय इ एस ने जाहीर केले आहे कि, जागतिक दर्जाचा चार मीटर इंटरनॅशनल लीक्वीड मिरर टेलिस्कोप आता आकाशातील वेध घेण्यासाठी सज्ज झाला आहे. उत्तराखंडमधल्या नैनिताल इथे भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या मंत्रालयाच्या अंतर्गत ए आर आय इ एस या स्वायत्त संस्थेच्या देवस्थळ इथल्या वेधशाळेंच्या २,४५० मीटर उंचीवर बसवण्यात आली आहे.

हे ही वाचा:

संजय राऊतयांनी आता डोक्यालाच गुंडाळले!

वींद्र वायकरसुद्धा ठाकरेंना सोडून चालले का?

इंटरपोलच्या रेड कॉर्नर नोटिशीच्या यादीतून मेहुल चोक्सी गायब!

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रेमात चिनी फॉलोअर्स

आयएलएमटी हि फक्त खगोलशास्त्रीय निरीक्षणासाठी बनवण्यात आलेली पहिली द्रवरूप अशीच दुर्बीण आहे. सध्या च्या वेळेत देशात उपलब्ध असलेली ही सर्वात मोठी दुर्बीण आहे. शिवाय भारतातील पहिली ऑप्टिकल सर्वेक्षण दुर्बीण सुद्धा आहे. असे सिंह यांनी सांगितले आहे. अवकाशाचे ठरविक पट्ट्याचे निरीक्षण करण्यासाठी रोज रात्री ही दुर्बीण दहा ते पंधरा गिगाबाईट डेटा तयार करेल. या दुर्बिणीमध्ये प्रामुख्याने तीन घटक उपलब्ध असतात पहिला एक मोठे भांडे ज्यामध्ये परावर्तित द्रव धातू असतो. दुसरा एअर बेअरिंग त्यावरती द्रवरूप आरसा असतो. आणि एक ड्राईव्ह सिस्टिम पण असते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,851चाहतेआवड दर्शवा
2,022अनुयायीअनुकरण करा
76,300सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा