28 C
Mumbai
Tuesday, September 27, 2022
घरक्राईमनामाप्रभादेवीत 'त्या' ठिकाणी सापडली काडतुसाची रिकामी पुंगळी

प्रभादेवीत ‘त्या’ ठिकाणी सापडली काडतुसाची रिकामी पुंगळी

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या दादर, प्रभादेवी भागात शनिवार, १० सप्टेंबर रोजी मध्यरात्री राडा झाला.

Related

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या दादर, प्रभादेवी भागात शनिवार, १० सप्टेंबर रोजी मध्यरात्री राडा झाला. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक आमनेसामने आले होते. यावेळी आमदार सदा सरवणकर यांनी गोळी चालवल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, सरवणकर यांनी हा आरोप फेटाळून लावला होता.

दादर पोलिसांनी ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणची पाहणी केली असता पोलिसांना एक काडतुसाची रिकामी पुंगळी सापडल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. ही सापडलेली रिकामी पुंगळी ही सदा सरवणकर वापरत असलेल्या परवाना असलेल्या पिस्तुलची आहे का हे तपासण्यात येणार आहे. सदा सरवणकर यांचे पिस्तुल आणि रिकामी पुंगळी तपासणीसाठी फॉरेन्सिक विभागाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज देखील पोलिसांच्या हाती लागल्यामुळे गोळीबार झाल्याची जवळजवळ खात्री पटल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. या सबळ पुराव्यावरून दादर पोलिसांनी आमदार सदा सर्वणकर यांच्यासह इतर १० ते १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आर्म्स कायदा (शस्त्र अधिनियम कायदा) कलम पोलिसांकडून लावण्यात आले आहे.

हे ही वाचा:

शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांचे ९९ व्या वर्षी निधन

नवरात्रीत धावणार मुंबई – अहमदाबाद वंदे भारत एक्सप्रेस

‘याकुब मेमनचा भाऊ रौफसह एका बैठकीत किशोरी पेडणेकर काय करत होत्या?’

राहुल गांधींच्या ४१ हजार रुपयांच्या टी शर्टची चर्चा

दादर पोलिसांनी शनिवारी रात्री ठाकरे गटावर गुन्हा दाखल करून विभाग प्रमुख महेश सावंत यांच्यासह पाच जणांना अटक करून त्यांच्या विरुद्ध दंगलीसह जबरी चोरीचे कलम लावले होते. मात्र, तपासात जबरी चोरी झाली नसल्याचे समोर आले असून हे ३९५ हे कलम काढण्यात आले असून त्यांची वैयक्तिक जामिनावर पोलीस ठाण्यातून सुटका करण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,965चाहतेआवड दर्शवा
1,942अनुयायीअनुकरण करा
40,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा