26 C
Mumbai
Monday, September 26, 2022
घरराजकारणराष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अधिवेशनात शरद पवारांनी सांगितला पेशव्यांचा पराक्रम

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अधिवेशनात शरद पवारांनी सांगितला पेशव्यांचा पराक्रम

दिल्लीत राष्ट्रवादीच्या अधिवेशनात पक्षापेक्षा भाजपाच्या कामगिरीचा लेखाजोखा

Related

राष्ट्रवादी काँग्रेसकडून नेहमीच पेशव्यांचा उद्धार केला जातो. पेशव्यांची नेहमीच हेटाळणी या पक्षाकडून केली जाते. दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अधिवेशनात मात्र पेशव्यांच्या पराक्रमाची दखल राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी घेतली आणि भाषणाला सुरुवात केली.

त्यांनी प्रारंभी दिल्लीच्या सत्तेसमोर छत्रपती शिवाजी महाराज कधी झुकले नाहीत हे सांगत भाषणाला प्रारंभ केला. शिवाजी महाराजांनी स्वाभिमानाचे दर्शन घडवत दिल्लीच्या सत्तेसमोर झुकायचे नाही, हे दाखवून दिले होते, असे पवार म्हणाले.

नंतर ते म्हणाले की, आपले अधिवेशन ज्या तालकटोरा स्टेडियममध्ये सुरू आहे त्या स्टेडियमचा इतिहास आहे. सदाशिवभाऊ पेशवा पुण्यातून इथे आले. पुण्यातून इथपर्यंतचा मुलुख त्यांनी जिंकला. इथे आल्यावर याच तालकटोरामध्ये डेरा टाकला. त्यानंतर त्यांना सूचना केली की दिल्ली जिंकून पुन्हा परता. पण सदाशिवभाऊंना सल्ला दिला कुणीतरी की गंगास्नान करा. पण इथला राजा सूरजमल जाट याने सूचना केली की, गंगा का दर्शन कभी भी मिल सकता है दिल्ली प्रथम जिंका. बाजीराव पेशव्याने याच दिल्लीत डेरा टाकला होता. त्याच जागेवर आपले अधिवेशन आहे.

हे ही वाचा:

नवरात्रीत धावणार मुंबई – अहमदाबाद वंदे भारत एक्सप्रेस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी का भेट घेतली रबर गर्लची?

‘सदा सरवणकर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा’

‘ब्रह्मास्त्र’ हिट की फ्लॉप !

शरद पवार यांनी या अधिवेशनात पक्षाच्या वाटचालीविषयी किंवा भविष्यातील योजनांविषयी बोलण्यापेक्षा भाजपालाच लक्ष्य केले. महागाई, इंधनांच्या दरातील वाढ यावरून केंद्र सरकारला त्यांनी लक्ष्य केले. शेतकऱ्यांसाठी जे तीन कायदे केंद्र सरकारने बनवले ते १५ मिनिटांत संमत झाले, असे सांगत त्यावर चर्चाच झाली नसल्याचे पवार म्हणाले.

अजित पवार नाराज?

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे राष्ट्रीय अधिवेशनात भाषणासाठी उपलब्ध नव्हते असे दिसल्याने त्यावर प्रश्न उपस्थित केले गेले. अजित पवार भाषणासाठी का नव्हते असे प्रश्न विचारले गेले. पण ते शरद पवारांच्या आधी बोलणार होते पण लघुशंकेसाठी गेल्याने ते भाषण करू शकले नाहीत. मात्र ते नाराज अजिबात नाहीत, असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकारांना सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,967चाहतेआवड दर्शवा
1,943अनुयायीअनुकरण करा
40,100सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा