29.2 C
Mumbai
Friday, April 19, 2024
घरक्राईमनामा'सदा सरवणकर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा'

‘सदा सरवणकर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा’

आमदार सदा सरवणकर यांच्याविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.

Google News Follow

Related

शिवसेनाचा बालेकिल्ला असलेल्या दादर, प्रभादेवी परिसरात शनिवार, १० सप्टेंबर रोजी मध्यरात्री पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक आमनेसामने आले होते. शाब्दिक चकमकीनंतर हाणामारी झाली आणि त्यानंतर दादर पोलिसांनी २५ शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले आहेत. तर शिवसेनेचे विभागप्रमुख महेश सावंत यांना अटक देखील करण्यात आली आहे. त्यानंतर शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेत दादर पोलीस स्टेशनबाहेर घोषणाबाजी केली.

आमदार सदा सरवणकर यांच्याविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात दादर पोलीस स्टेशन बाहेर आंदोलन करण्यात आलं. तेव्हा सदा सरवणकर यांनी गोळीबार केला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे.

हे ही वाचा:

मुंबई विमानतळावरून ६ कोटींच सोनं जप्त

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिंदे- ठाकरे समर्थक आमनेसामने, गोळीबार झाल्याचा दावा

भारतीयत्वाला विसरलात आता बॉलिवूडची खैर नाही

आलिया भटला श्रेयस तळपदेने सुनावले

एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या संतोष तेलवणे यांनी गणेश विसर्जना दरम्यान झालेल्या वादाबाबत फेसबुकवर आणि व्हाट्सएपच्या एका पोस्टमध्ये अपशब्द वापरले होते. त्यावरून झालेल्या वादातून शिवसैनिकांनी संतोष तेलावणे यांना शनिवारी मारहाण केली. या प्रकरणानंतर समाधान सरवणकर यांनी प्रभादेवी सर्कलजवळ गोंधळ घातला. दरम्यान सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप देखील करण्यात आला मात्र, सदा सरवणकर यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा