29 C
Mumbai
Tuesday, October 3, 2023
घरविशेषआलिया भटला श्रेयस तळपदेने सुनावले

आलिया भटला श्रेयस तळपदेने सुनावले

Google News Follow

Related

बॉलीवूडमधील काही चित्रपटांवर बहिष्कार घालण्याचा एक ट्रेंड सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. लालसिंग चढ्ढा, दोबारा या चित्रपटांवर लोकांनी बहिष्कार घातला आणि त्याचा फटकाही या चित्रपटांना बसला. या पार्श्वभूमीवर करिना कपूर, आलिया भट, अर्जुन कपूर, स्वरा भास्कर, सुनील शेट्टी यांनी बहिष्काराच्या ट्रेंडवर टीका केली होती आणि प्रेक्षकांनी चित्रपट पाहायला यायचे असतील तर या नाहीतर नका येऊ अशी भूमिका घेतली होती. त्यावर आता सिने अभिनेता श्रेयस तळपदेने त्यांना सुनावले आहे.

ब्रह्मास्त्रची नायिका आलिया भटने म्हटले होते की, तुम्हाला जर मी आवडत नसेन तर मला पाहायला येऊ नका.

यावर श्रेयस तळपदे याने श्रीगणेशाकडे मागणी केली आहे की, बॉलिवूडच्या सेलिब्रिटिंना थोडी बुद्धी द्यावी अशी मी श्रीगणेशाकडे प्रार्थना करतो आहे. या सेलिब्रिटी बहिष्काराच्या या ट्रेंडबाबत तुसड्या प्रतिक्रिया देत आहेत. या बहिष्काराबाबत ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया या सेलिब्रिटींकडून येत आहेत, त्या मला पसंत पडलेल्या नाहीत. गणेशोत्सवाच्या निमित्ताने श्रेयसने ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

हे ही वाचा:

मुंबई विमानतळावरून ६ कोटींच सोनं जप्त

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिंदे- ठाकरे समर्थक आमनेसामने, गोळीबार झाल्याचा दावा

भारतीयत्वाला विसरलात आता बॉलिवूडची खैर नाही

मातोश्रीवर… तो परत आलाय !

 

आलिया भटने जे वक्तव्य केले होते त्यावर श्रेयस म्हणाला की, मी तुम्हाला आवडत नसेल तर माझा चित्रपट पाहायला येऊ नका, असे म्हणणे हे अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे तुम्ही प्रेक्षकांपासून दूर जाता. जोपर्यंत प्रेक्षक तुम्हाला पसंत करतात तोपर्यंतच अभिनेत्याचे अस्तित्व असते हे लक्षात ठेवावे.

श्रेयसने यासाठी एक उदाहरण दिले की, जर जोडप्यापैकी एखादा आपल्या सहचराबद्दल नाराज असेल तर त्याला सोडून जा असे तात्काळ म्हणता येते का? उलट त्याने रागावू नये म्हणून त्याचे मन वळवले जाते. चूक झाली असेल तर माफी मागून त्याचा विश्वास जिंकला जातो.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,844चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
102,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा