उत्तर प्रदेशमधील बरेली जिल्ह्यात भगवान श्रीरामांविषयी वादग्रस्त टिपण्णी करणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. अनस पठान असे आरोपीचे नाव असून त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. अनस याने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर भगवान श्रीरामांविषयी अपमानजनक शब्द वापरून एक पोस्ट लिहिली होती. शिवाय ती अनेक ग्रुपमध्ये व्हायरल देखील केली होती.
अनस याची पोस्ट व्हायरल होताच याची दखल घेत हिंदू संघटना आणि स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला. ही पोस्ट धार्मिक भावना भडकवणारी असल्याचे सांगत लोकांनी पोलिस आणि सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच बरेली पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी २४ तासांच्या आत आरोपीला अटक केली. पोलिसांनी त्याचा मोबाईल फोन, सोशल मीडिया अकाउंट्स आणि पोस्टसंबंधी सर्व पुरावे जप्त केले आहेत. दरम्यान, पोलिसांनी आरोपीचा एक व्हिडिओही प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये तो हात जोडून माफी मागताना दिसत आहे.
हेही वाचा’..
छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय वैभवाचे प्रेरणास्थान बनेल
‘एसटीईएम’ महिलांना संधी देणे आवश्यक
ब्राझीलमध्ये ड्रग्ज टोळ्यांविरोधातील कारवाईत १२१ जणांचा मृत्यू
ट्रम्प यांच्या नावाने बनावट आधार प्रकरणात आमदार रोहित पवारांवर गुन्हा दाखल
पोलिस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, कोणालाही धर्म, समाज किंवा समुदायाविरुद्ध अपमानास्पद भाषा वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही. नगर क्षेत्राधिकारी प्रथम आशुतोष शिवम यांनी सांगितले की बरेली पोलिस पूर्णपणे सतर्क आहे. कोणीही सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखावण्याचा किंवा सामाजिक सौहार्द बिघडवण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्यावर तत्काळ कठोर कारवाई केली जाईल.







