28 C
Mumbai
Wednesday, March 29, 2023
घरक्राईमनामाआसाममध्ये बालविवाहाच्या मुद्द्यावरून १३९ पुरुष अटकेत, पत्नींची आंदोलने

आसाममध्ये बालविवाहाच्या मुद्द्यावरून १३९ पुरुष अटकेत, पत्नींची आंदोलने

तर ६० पुजाऱ्यांना सुद्धा अटक.

Google News Follow

Related

दक्षिण आसाम मधील बाराक खोऱ्यात  शंभरहुन अधिक विवाह रद्द करण्यात आले आहेत, तर काही त्यापैकी रद्द करण्यात आले आहेत. तर संपूर्ण राज्यात बालविवाहावर मोठ्या प्रमाणांत पोलिसानीं कारवाई करून, रविवारपर्यंत २,२७८ लोकांना अटक करण्यात  आली तर , या प्रकरणातील ४०७४ प्रकरणे नोंदवण्यात  आली आहेत.

आसाम मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर २३ जानेवारी रोजी १८ वर्ष वय असणाऱ्या मुलींशी विवाह केलेल्या पुरुषांना अटक किंवा शिक्षा करण्याचे आदेश पोलिसांना निर्देश देण्यात आले होते. पॉक्सो कायद्याअंतर्गत १४ ते १८ वयोगातील मुलींशी विवाह करणाऱ्या पुरुषांना पॉक्सो कायद्यांतर्गत आणि बालविवाह कायदा २००६ अंतर्गत अटक करण्याचे आदेश देण्यात आले.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा म्हणाले कि, अलीकडच्या काळात एक लाखाहून अधिक अल्पवयीन मुलींचे विवाह झाले आहेत ज्यात अनेक बालमाता आहेत. त्यात एक नऊ वर्षाची मुलगी  बालमाता झाली आहे. हे बेकायदेशीर विवाह करणाऱ्या पालकांवर , पुजाऱ्यांवर  कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. डिजिपी जीपी सिंग यांनी सांगितले की,बहुसंख्य बालवधू या मध्य आणि खालच्या धार्मिक अल्पसंख्यांक समुदायातील  असून त्यात  बांगलादेशी स्थलांतरितांची संख्या जास्त आहे. सरकारने योजनांच्या लाभांची गरज नाही. आम्हाला आमचे पती हवे आहेत.

कचरा जिल्ह्यातील १६ वर्षाच्या मुलीने प्रेम असलेल्या मुलाशी लग्न करू दिले नाही म्हणून गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे हे प्रकरण समोर आले आहे. भागा परिसरातील सरसपूर गावातील शनिवारी दुपारी झाडाला लटकलेल्या अवस्थेत  ती मुलगी आढळली. तिच्या आईने सांगितले की, आम्ही मान्य केले नाही तर तिने आम्हाला पळून  जाऊन लग्न करण्याची  भीती दाखवली होती. ती अल्पवयीन असल्यामुळे आम्ही तिला समजावण्याचा खूप प्रयन्त केला,असे तिने रविवारी सांगितले. सूत्रांनी सांगितले की, लोक भीतीपोटी लग्न रद्द करत आहेत किंवा पुढे तरी ढकलत आहेत.

हे ही वाचा:

अमेरिकेने फोडला चीनचा फुगा; चीनने व्यक्त केला संताप

श्रीराम आणि सीतामाईना मूर्त स्वरूप देणारे मराठमोळे हात

पुणेकर लवकरच घेणार डबलडेकर प्रवासाचा आनंद

आशियातला पहिला हेलिकॉप्टर कारखाना बनवण्याचा बहुमान भारताला

फक्त कचर जिल्ह्यात सहा लग्न रद्द करण्यात आली आणि तीनच दिवसात ती संख्या १०० वर पोचली आहे. बिश्वनात जिल्ह्यात अल्पवयीन असताना लग्न करण्यात आलेल्या अटक झालेल्या पुरुषांच्या पत्नी आपल्या पतीच्या सुटकेसाठी सरकारी योजनातुन मिळणारी मदत सोडण्याच्या तयारीत आहेत. रविवारी बिस्वनात मध्ये एकूण १३९ पुरुषांना अटक करण्यात आली आहे. जवळपास २० महिलांनी रविवारी आपल्या पतीच्या सुटकेसाठी पोलीस स्थानकाच्या बाहेर ठाण मांडून होत्या.

२०२१ मध्ये वयाच्या १६ व्या वर्षी लग्न झालेल्या मुलीने सांगितले की, आम्हाला सरकारी लाभांची गरज नाही आम्हाला पतीची गरज आहे आमच्या घरी तो एकटाच कमावणारा आहे , तो तुरुंगात असेल तर आमचे कुटुंब कोण चालवणार ? असा सवाल त्यांनी केला. कायदा आणि सुव्यवस्था आसाम पोलीस आय जी प्रशान्त कुमार भुयान यांनी सांगितले कि, शुक्रवारी अटक करण्यात आलेल्या २४ जणांना माजुली न्यायालयाने सोडले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,877चाहतेआवड दर्शवा
2,035अनुयायीअनुकरण करा
65,700सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा