पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भूतान देशाची नागरिक असलेल्या २७ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही महिला २०२० पासून पुण्यात वास्तव्याला असून माहितीनुसार, ही पीडित महिला ही २०२० मध्ये भारतात आली होती. पुण्यातील या धक्कादायक प्रकरणात, पोलिसांनी भूतानी महिलेवर झालेल्या बलात्काराच्या आरोपाखाली आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे, असे वृत्त ‘द फ्री प्रेस जर्नल’ने दिले आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) नेते शंतनू सॅम्युअल कुकडे यांचे नाव समोर आले आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) नेते शंतनू कुकडे यांना अटक करण्यात आलेल्या दुसऱ्या एका प्रकरणाच्या चौकशीदरम्यान हे प्रकरण उघडकीस आले. पोलिस उपायुक्त (झोन १) संदीप सिंग गिल यांनी ‘द फ्री प्रेस जर्नल’ला सांगितले की, “आठ जणांविरुद्ध नवीन तक्रार दाखल करण्यात आली आहे, ज्यामध्ये तिघांवर विनयभंगाचा आरोप आणि इतरांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि उर्वरित दोघांना लवकरच अटक केली जाईल. प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि त्यानुसार कारवाई केली जाईल.” अटक करण्यात आलेल्यांमध्ये विपिन बिडकर नावाचा वकील असल्याचीही माहिती समोर आली आहे.
प्रकरण काय?
पीडित महिला मूळची भूतान देशाची असून २०२० मध्ये ती भारतात आली होती. त्यानंतर शिक्षण आणि नोकरी करण्याच्या निमित्ताने तिची ओळख आरोपी ऋषिकेश याच्यासोबत झाली. ऋषिकेश याने पीडित महिलेची ओळख त्याचा मित्र शंतनू कुकडे याच्यासोबत करून दिली. कुकडे याने पीडित महिलेला पुण्यात एक घर वास्तव्यास दिले तसेच तिच्या शिक्षणासाठी देखील आर्थिक मदत केली. याच ओळखीचा फायदा घेत कुकडे याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
शंतनू कुकडे याच्यावर काही दिवसांपूर्वी दोन तरुणींनी लैंगिक अत्याचारप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी त्या प्रकरणी गुन्हाही दाखल केला होता. आताच्या प्रकरणात पोलिसांनी शंतनू कुकडे आणि त्याच्या मित्रांना अटक केली आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यावरून शंतनू कुकडे याच्यासह ऋषिकेश नवले, जालिंदर बडदे, उमेश शहाणे, प्रतीक शिंदे, ॲड विपीन बिडकर, सागर रासगे, अविनाश सूर्यवंशी आणि मुद्दासीन मेनन यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली.
हे ही वाचा :
बंगाल की बांगलादेश? वक्फविरोधात मुर्शिदाबाद पेटले
पुनर्वास एज्युकेशन सोसायटीतर्फे गुरुवारी जागतिक होमिओपॅथी दिन
पुण्यात सलूनमध्ये तरुणीचे धर्मांतर; चालकाला चोप!
मनोरंजन कालिया यांच्या घराबाहेर झालेल्या स्फोटामागे आयएसआयचा हात
शंतनू कुकडे याच्यावर काही दिवसांपूर्वी लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्याचा तपास करताना काही गोष्टी समोर आल्या. त्यामध्ये आणखी एक फिर्यादी समोर आली आहे. त्या फिर्यादीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंतनू कुकडे हा मुख्य आरोपी असून पीडित महिला ही गेल्या चार-पाच वर्षांपासून शंतनू कुकडे याला ओळखत होती. एक- दोन वर्षांनी शंतनूचे मित्रही तिला भेटू लागले. हे सगळेजण अनेकदा बाहेरही जायचे. या मित्रांनी वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या वेळी पीडित तरुणीवर लैंगिक अत्याचार केले.