25 C
Mumbai
Thursday, July 18, 2024
घरक्राईमनामाड्रग्ज पार्ट्यांमध्ये विषारी सापांचं विष पुरवल्याच्या आरोपानंतर ‘बिग बॉस’ विजेता एल्विश यादववर...

ड्रग्ज पार्ट्यांमध्ये विषारी सापांचं विष पुरवल्याच्या आरोपानंतर ‘बिग बॉस’ विजेता एल्विश यादववर गुन्हा

रेव्ह पार्टी आयोजित केल्याचा आरोप

Google News Follow

Related

‘बिग बॉस ओटीटी’चा विजेता युट्युबर एल्विश यादव याच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोएडा पोलिसांनी त्याच्याविरोधात एफआयआर दाखल केला असून एल्विश यादव याच्यावर तस्करी तसेच रेव्ह पार्टी आयोजित केल्याचा आरोप आहे.

नोएडा पोलिसांनी सेक्टर ४९ मध्ये छापा टाकून पाच जणांना अटक केली आहे. शिवाय पोलिसांनी येथून पाच कोब्रा साप देखील जप्त केले असून यासोबतच सापांचे विष देखील पोलिसांच्या हाती लागले आहेत. दरम्यान, या कारवाईवेळी पोलिसांनी केलेल्या चौकशीत ‘बिग बॉस’ विजेता एल्विश यादव याचे नाव समोर आले आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी एल्विश यादव याच्या विरोधात एफआयआर दाखल केली आहे. माहितीनुसार, एका एनजीओने स्टिंग ऑपरेशन करत नोएडा पोलिसांकडे याबाबत तक्रार केली होती.

एल्विश यादव याच्या नावाचा आरोपींमध्ये समावेश आहे. ही एफआयआर पीपल फॉर अॅनिमल वेलफेयर ऑफिसर पदावर काम करत असलेल्या गौरव गुप्ता यांनी दाखल केली होती. गौरव गुप्ता यांना असे प्रकार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. तसेच प्रसिद्ध यूट्यूबर एल्विश यादव नोएडा-एनसीआरच्या फार्महाऊसवर काही लोकांना भेटून सापाचे विष पुरवून आणि जिवंत सापांसोबत व्हिडीओ शूट करत असल्याबद्दल माहिती मिळाली होती. रेव्ह पार्टीदेखील आयोजित केल्याची माहिती समोर आली होती.

हे ही वाचा:

मुंबईहून सिंधुदुर्गला विमान गेलं पण आकाशात घिरट्या घालून माघारी आलं

ललित पाटीलसह त्याच्या १२ साथीदारांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई

भारत- श्रीलंका सामन्यादरम्यान ११ विक्रम

‘मुली, मी तुला आशीर्वाद देतो, तुझे नाव लिही. मी तुला नक्की पत्र लिहीन’

पोलिसांनी केलेल्या छापेमारीत सापाचे विष, पाच कोब्रा, एक अजगर आणि दोन तोंड असलेला एक साप आढळले आहेत. पोलिसांनी सांगितले की या छापेमारीत पाच आरोपींना अटक केली आहे. एल्विश यादवसह सहा जण आणि काही अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ड्रग्ज पार्ट्यांमध्ये विषारी सापांचं विष पुरवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. एल्विश यादव याच्या सहभागाचा तपास केला जाणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
164,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा