28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
घरविशेषमसाले आणि लोणचे किंग अतुल बेडेकर यांचे वयाच्या ५६ व्या वर्षी निधन!

मसाले आणि लोणचे किंग अतुल बेडेकर यांचे वयाच्या ५६ व्या वर्षी निधन!

अतुल बेडेकर हे व्ही पी. बेडेकर अँड सन्सचे संचालक होते

Google News Follow

Related

लोणचे, मसाले, चटणी यासारख्या पारंपरिक मराठी खाद्यपदार्थ व्यवसायातील प्रतिष्ठित नावाचे व्ही पी. बेडेकर अँड सन्सचे संचालक अतुल बेडेकर यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले आहे.कॅन्सरशी प्रदीर्घ लढा दिल्यानंतर त्यांनी वयाच्या ५६ व्या वर्षी त्यांनी अखेचा श्वास घेतला. सकाळी ११ वाजता त्यांच्या गिरगावातील राहत्या घरून अंत्ययात्रा निघणार आहे.

१९१० साली विश्वनाथ पर्शराम बेडेकर यांनी गिरगावात लहानसं किराणामालाचं दुकान सुरू केलं. त्याच दुकानात त्यांनी मसाले आणि लोणची ठेवण्यास सुरूवात केली. मसाले लोणची यांचा खप भरपूर व्हायला लागल्यावर दुकानांच्या शाखा काढायला सुरूवात केली. मुगभाट, दादर, फोर्टमध्ये माणकेश्वर मंदिराजवळ बेडेकरांची अल्पावधीतच पाच दुकाने झाली. पुढे धंद्याचा व्याप वाढता राहिल्यावर १९४३ मध्येच ‘व्ही. पी. बेडेकर आणि सन्स लिमिटेड’ असं कंपनीचं नामकरण करण्यात आलं.१२३ वर्षांची परंपरा जपणारी ही त्यांची चौथी पिढी आहे.

हे ही वाचा:

“ज्या व्यक्तीने राष्ट्रवादाचा झेंडा खांद्यावर घेतला त्या व्यक्तीचा टॅग डोक्यावर लावून घेण्यास हरकत नाही”

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण अखेर मागे; सरकारला २ जानेवारीपर्यंत दिला वेळ

मराठा आरक्षणामुळे संभाजीनगरातील आठ आगाराच्या एसटी बस जागेवरच!

बँक कर्जाचे पैसे जेटच्या संस्थापकांनी पत्नी, मुलाच्या माध्यमातून इतरत्र वळवले

१९६० साली भारतात प्रथम पी. पी. लीक प्रूफ कॅप्स बेडेकरांनी वापरल्या. आणि मग लोणचं निर्यात होऊ लागलं.कर्जतच्या फॅक्टरीत जवळपास ६०० टन लोणचं सीझनला बनतं.महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये विक्री होते. त्याचबरोबर सातासमुद्रापलीकडे बेडेकर नाव पोहचले आहे. अमेरिका, कॅनडा, मध्य पूर्व, ऑस्ट्रेलिया, युरोप आणि पूर्वेकडील देशांमध्ये देखील निर्यात होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
167,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा