31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
घरक्राईमनामापुण्यात 'एनआयए'कडून दहशतवादी मोहम्मद आलमला अटक!

पुण्यात ‘एनआयए’कडून दहशतवादी मोहम्मद आलमला अटक!

अनेग दहशतवादी कारवायांमध्ये दहशतवादी मोहम्मदचा सहभाग

Google News Follow

Related

पुण्यात एनआयएकडून आणखी एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. ‘इस्लामिक स्टेट’चे (आयएसआयएस ) महाराष्ट्र मॉड्यूल उद्ध्वस्त केले. शस्त्र चालवणं आणि स्फोटकांचे सराव वर्ग घेत असल्याचं तपासात समोर आलं आहे. पुणे (ISIS) मॉड्युल प्रकरणात अटक करण्यात आलेला हा आठवा दहशदवादी आहे.अटक करण्यात आलेल्या दहशतवादी मोहम्मदचा अनेग दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय सहभाग होता.

महंमद शाहनवाज आलम (वय ३१, मूळ झारखंड), असे अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे. लपण्याचे ठिकाण शोधणे, शस्त्र चालवण्याचे आणि स्फोटकांचे सराव वर्ग आयोजित करण्यात आलमचा सहभाग होता. जुलै महिन्यात कोथरूड येथे दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली तेव्हा आलम पसार झाला होता.

पुढे एनआयएने शाहनवाज आलमला पकडण्यासाठी तीन लाखाचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. ISIS मॉड्युलप्रकरणी एनआयएने केलेल्या तपासात समोर आले आहे की, आरोपी व्यक्तींनी ISIS अजेंडा पुढे नेण्यासाठी देशातील शांतता आणि जातीय सलोखा बिघडविण्याच्या उद्देशाने दहशतवादी कृत्ये करण्याची योजना आखली होती. दहशतवाद्यांनी पुण्यासह काही शहरांमध्ये घातपाताची योजना आखली होती, अशी माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा:

अब की बार…३२५ पार

मसाले आणि लोणचे किंग अतुल बेडेकर यांचे वयाच्या ५६ व्या वर्षी निधन!

पाकिस्तानकडून अफगाणिस्तानी निर्वासितांवर क्रूर अत्याचार!

मुंबईहून सिंधुदुर्गला विमान गेलं पण आकाशात घिरट्या घालून माघारी आलं

 

शाहनवाजवर ISIS मॉड्यूलशी संबंध असल्याचा आरोप आहे. चौकशीदरम्यान त्याने गुजरातमधील अक्षरधाम मंदिरावरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार फरतुल्ला गौरी आणि त्याचा जावई शाहिद फैसल यांच्या संपर्कात असल्याचं सांगितले. तो पाकिस्तानमध्ये आयएसआयच्या आश्रयाने राहत असल्याचं उघड झालं आहे.

ISIS, ज्याला इस्लामिक स्टेट (IS), इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड द लेव्हंट (ISIL), इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (ISIS), Daish, इस्लामिक स्टेट इन खोरासान प्रांत (ISKP), ISIS विलायत खोरासान, आणि इस्लामिक स्टेट म्हणूनही ओळखले जाते. इराक आणि शाम खोरासान (ISIS-K), सक्रियपणे भारतविरोधी अजेंडा राबवत आहे आणि हिंसक कृत्यांच्या मालिकेद्वारे देशभरात दहशत आणि हिंसाचार पसरवत आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा