कर्नाटकमध्ये बंगळूरू पोलिसांनी एका ब्लिंकिट डिलिव्हरी एजंटला छेडछाड प्रकरणी अटक केली. आरटी नगर येथील एका ब्राझिलियन महिलेची तिच्या घरी छेडछाड केल्याच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली. ही संबंधित घटना १७ ऑक्टोबर रोजी घडली असल्याची माहिती आहे. यानंतर २५ ऑक्टोबर रोजी ब्राझिलियन महिलेच्या मालकाने तक्रार दाखल केल्यानंतर कारवाई करून ही अटक करण्यात आली.
आरोपीचे नाव कुमार राव पवार असे असून तो आरटी नगर येथील रहिवासी आहे. तो बेंगळुरूमधील एका खाजगी संस्थेत शिक्षण घेत असलेला महाविद्यालयीन विद्यार्थी आहे. ब्लिंकिटमध्ये डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह म्हणून तो अर्धवेळ काम करत होता.
हे ही वाचा :
अवघ्या ११ महिन्यात विवाहितेचा मृत्यू; स्लो पॉइजन देऊन हत्या केल्याचा आरोप
हाफिज सईदचा निकटवर्ती झहीर बांगलादेश दौऱ्यावर; सीमावर्ती जिल्ह्यांना दिल्या भेटी
“महागठबंधन सुधारणा करू शकते पण वक्फ कायदा रद्द करू शकत नाही”
ब्राझिलियन महिला ज्या मालकाकडे काम करते त्या मालकाने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, ही महिला आरटी नगरमधील एका अपार्टमेंटमध्ये इतर दोन महिलांसोबत राहत होती. १७ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.२० च्या सुमारास, एका महिलेने ब्लिंकिट अॅपद्वारे जेवण ऑर्डर केले. डिलिव्हरी एजंट आल्यावर, ती महिला ऑर्डर घेण्यासाठी दारात गेली. तक्रारीत असे म्हटले आहे की, यावेळी डिलिव्हरी एजंटने अनुचित वर्तन केले, तिला चुकीचा स्पर्श केला आणि तिचा विनयभंग केला. या घटनेने धक्का बसलेल्या महिलेने त्याला दूर ढकलले, दार बंद केले. शिवाय काय घडले याची वाच्यता लगेच केली नाही. नंतर, तिने आणि तिच्या सोबतीला राहणाऱ्या महिलांनी ही घटना त्यांच्या मालकाला कळवली. त्यांनी तातडीने सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि पोलिसांशी संपर्क साधण्यापूर्वी घटनेची पुष्टी केली. भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ७५(१) आणि ७६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, सविस्तर तपास सुरू आहे.







