बाबू अयान खानने आपल्या जन्माचा खोटा दाखला मुंबई महापालिकेच्या M (East) वॉर्ड ऑफीस मधून मिळवला आणि त्याच्या आधारावर आपले आधारकार्ड देखील बनवले असे तपासात निष्पन्न झाले असल्याचे वृत्त आहे.
बाबू अयान खानने “ज्योती” हे नाव घेतले याचे कारण हे आहे की हिंदू नाव घेतले की कमी चौकशा होतात हे त्याला माहिती आहे. चेल्यांकडून स्वतःला “गुरु माँ” म्हणवून घेणे हा देखील स्वतःला हिंदू भासवण्याच्या कारस्थानाचाच भाग होता. तृतीय पंथीयांमध्ये गुरु शिष्य परंपरेला अनन्य साधारण महत्व आहे. प्रत्येक नवीन तृतीय पंथीय हा कोणत्या ना कोणत्या जेष्ठ तृतीयपंथीयाला आपला गुरु मानून त्याचे शिष्यत्व स्वीकारतो. स्वतःला गुरु माँ म्हणवुन घेतल्याने बाबू अयान खानला तब्बल ३०० “शिष्य” मिळाले आणि या चेल्यांची फौज उभारून त्याने हिंदू किन्नरांना पिटाळून तृतीयपंथीय भिक्षेकऱ्यांच्या जिवावर स्वतःचे गुन्हेगारी आणि आर्थिक साम्राज्य उभारले.
हे ही वाचा:
हाफिज सईदचा निकटवर्ती झहीर बांगलादेश दौऱ्यावर; सीमावर्ती जिल्ह्यांना दिल्या भेटी
“श्रेयस अय्यरची प्रकृती आता…” सूर्यकुमार यादवने काय सांगितले?
मालवणी रंगभूमीचा आधारस्तंभ हरपला, ‘वस्त्रहरण’चे लेखक गंगाराम गवाणकर यांचं निधन!
“भारतासोबत खूप मोठी चूक करतोय” अमेरिकेच्या माजी वाणिज्य सचिवांनी असे का म्हटले?
बांगलादेशातून अवैध रीतीने येऊन आपल्या बनावट भारतीय कागदपत्रांचा वापर करून मुंबईत तब्बल तीन दशके वास्तव्य करणाऱ्या बाबू अयान खानने मुंबईततील गोवंडी येथील शिवाजीनगर (रफिक नगर) वस्तीत म्हाडाची जवळपास २०० घरे आणि अनेक झोपड्या बळकावल्या. त्यांच्या भाड्यापोटी त्याला महिन्याला लक्षावधी रुपये मिळतात. बांगलादेशी मुसलमानांना अवैध रीतीने पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये आणि नंतर तिथून मुंबईला आणून स्थायिक करण्याचे एक सुनियोजित रॅकेट देखील बाबू अयान खान चालवत होता.
बाबू अयान खानची कार्यशैली
बाबू अयान खानचे सीमापार मानवी तस्करी करणाऱ्या टोळ्यांशी संबंध होते हे मानवी तस्करी करणारे नेटवर्क बांगलादेशी मुसलमानांना भारतात बेकायदेशीररित्या आणून पश्चिम बंगालमधील “मुर्शिदाबाद” येथे पोहोचवे. तेथून त्यांना मुंबईत आणून बाबू अयान खानच्या ताब्यात दिले जाई. बाबू अयान खान त्यांना मुंबईत वसण्यास मदत करत असे.
सीमा ओलांडण्यासाठी मुर्शिबादच का?
भारत आणि बांगलादेशमधील सीमारेषेची एकूण लांबी १२५.३५ किमी आहे. त्यात ४२.३५ किमी लांबीची जमीनी सीमा आणि ८३ किमी लांब नदीची सीमा आहे. मुर्शिदाबाद सीमेच्या जवळ असून तेथील सुमारे ७०% लोकसंख्या मुसलमान आहे. बंगाली भाषिक मुस्लिम बहुल शहर असल्याने मुर्शिदाबादमध्ये लपणे घुसखोरांना सहजपणे शक्य होई. मुर्शिदाबादमधून या घुसखोर मुसलमानांना काही दिवसांसाठी कोलकातामध्ये ठेवण्यात येते. तेथे आधुनिक तंत्रज्ञान वापरून त्यांच्यासाठी बनावट जन्म प्रमाणपत्रे आणि शाळा सोडल्याचे दाखले बनवण्यात येतात. त्यानंतर त्यांना मुंबईसह विविध शहरांमध्ये रवाना करण्यात येते.
पश्चिम बंगालमध्ये गेली १५ वर्षे तृणमूल काँग्रेसची सत्ता राहिली आहे. त्यापूर्वीची १५ वर्षे तेथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची सत्ता होती. मतपेढीचे राजकारण म्हणून या दोन्ही पक्षांनी बांगलादेशी मुसलमानांच्या आणि रोहिंग्यांच्या घुसखोरीला कायम उत्तेजन दिले. राजाश्रय आणि भ्रष्ट प्रशासन यामुळे कोलकात्यात भारतीय नागरिकत्व दर्शवणारी बनावट कागदपत्रे सहजासहजी तयार करता येतात. अशी बनावट कागदपत्रे बनवणारी एक परिसंस्थाच तिथे कार्यरत आहे. या बनावट कागदपत्रांच्या आधारे आधार कार्ड, रेशन कार्ड, PAN कार्ड अशी अधिकृतरित्या बनवली जातात. त्यापुढे जाऊन मतदार ओळख पत्र आणि पासपोर्टसारखे दस्तऐवज देखील अशा मार्गाने घुसखोर मिळवतात. यासाठी त्यांना मुस्लिम लांगुलचालन करणाऱ्या पक्षांचे स्थानिक पातळीवरील राजकीय नेते मदत करतात.
मुंबईत शिवाजीनगर, रफिक नगर, गोवंडीच का?
मुंबईच्या गोवंडी भागातील घनदाट लोकसंख्येच्या वस्तीचे नाव शिवाजीनगर असले तरी ती मुस्लिम बहुल वस्ती आहे. रफिक नगर हा शिवाजीनगर वस्तीचाच भाग आहे. कोणत्याही मुसलमानाला सुतराम संबंध नसताना “अपनेवाला” या इस्लामी “उम्मा”च्या बंधु भावनेने मुस्लिम बहुल वस्तीत सामावून घेतले जाते. समाजवादी पक्षाचे अबू असीम आजमी २००९ पासून या भागातून विधानसभेवर निवडून येतात.
बाबू अयान खानने अवैध रीतीने हडपलेल्या म्हाडाच्या घरातील एका खोलीत किंवा झोपडपट्टीतील प्रत्येक झोपडीत ४ ते ५ या बांगलादेशी घुसखोर मुसलमानांना राहायला जागा देऊन त्यांच्याकडून प्रत्येकी दरमहा ५ ते १० हजार रुपये भाडे वसूल केले जाते.
घरभाडे, दोन वेळचा भोजन खर्च आणि जगण्यासाठी किमान आवश्यक पैसा मिळवण्यासाठी या बांगलादेशी घुसखोरांना मुंबईत बांधकाम क्षेत्रात काम मिळवून दिले जाते. तसेच बांगलादेशी घुसखोर मुसलमान महिला उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये मोलकरीण म्हणून घरकामासाठी जातात. याशिवाय अंमली पदार्थ विक्री, वेश्यावृत्ती, तृतीयपंथी बनून सिग्नलवर भीक मागणे यासारखी गुन्हेगारी स्वरूपाची कृत्येही ते करतात.
तृतीयपंथीयांचे आशीर्वाद फळतात आणि शाप बाधतात अशी भावना समाजात असल्याने अशा घातकी तृतीय पंथीयांना रोज भरपूर भीक मिळते. मुंबईच्या सिग्नल्सवर व लोकल ट्रेनमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये भिक मागणाऱ्या तृतीयपंथीयांची संख्या लक्षणीय रित्या वाढली आहे.
मुंबई पोलिसांनी आता बाबू अयान खानभोवती पासपोर्ट कायद्यासह अनेक कायद्यांअंतर्गत बनावटगिरी, फसवणूक आणि इमिग्रेशन उल्लंघन अशा आरोपांचा फास आवळला आहे. बाबू अयान खानचे चेलेचपाटे, त्याला मदत करणारे यांचाही तपास सुरु आहे.
घुसखोरी, बनावट कागदपत्रे बनवणे आणि वापरणे, जागा बळकावणे, भीक मागणे, वेश्या व्यवसाय याखेरीज महिला व लहान मुलांची तस्करी, बनावट भारतीय चलनाची तस्करी, आयएसआयसारख्या परदेशी गुप्तचर संस्थांसाठी हेरगिरी, दहशतवादी कृत्यात सहभाग यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये बाबू अयान खान आणि त्याच्या चेल्याचपाट्यांचा सहभाग आहे काय याचा छडा देखील लावण्याची आवश्यकता आहे.
मुळावर घाव घालण्याची आवश्यकता
घुसखोरांना बांगलादेश मधून भारताची सीमा पार करण्यात मदत करणारी, त्यांना खोटे दस्तावेज बनवून भारतीय असल्याचे दाखवत देशाच्या विविध भागात स्थायिक करणारी परिसंस्था उध्वस्त करणे अत्यावश्यक आहे. आज केंद्रामध्ये बांगलादेशी मुसलमानांच्या व रोहिंग्यांच्या अवैध घुसखोरीची समस्या मुळापासून उखडून टाकण्याची जबरदस्त राजकीय इच्छाशक्ती असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार कार्यरत आहे. परंतु, दुर्दैवाने ममता बॅनर्जी यांचे पश्चिम बंगालचे राज्य सरकार यात केंद्र सरकारला कोणतेही सहकार्य करण्याच्या ऐवजी अडथळे आणत आहे. केंद्रीय तपास यंत्रणांना पश्चिम बंगालमध्ये तपास करण्यावर बंदी आहे. उद्धव ठाकरे यांचे महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना असताना महाराष्ट्रातही अशीच बंदी घातली होती हे येथे उल्लेखनीय आहे.
यासारख्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने ऑक्टोबर २०२१ मध्ये सीमा सुरक्षा दलाच्या तपास करण्याची, जप्तीची कारवाई करण्याची आणि संशयितांना अटक करण्याची अधिकार मर्यादा आंतरराष्ट्रीय सीमेपासून १५ किलोमीटर वरून ५० किलोमीटर पर्यंत वाढवली आहे.
बनावट कागदपत्रांचा वापर करून अनेक बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांनी आपली नावे मतदारयादीत समाविष्ट करून घेतल्याचे बिहारमधील मतदारयाद्यांच्या विशेष सखोल तपास मोहिमेतून सिद्ध झाले आहे. महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्येही अशाच प्रकारे घुसखोरांची नावे मतदारयाद्यांमध्ये घुसवण्यात आलेली असण्याची शक्यता आहे. घुसखोरांना स्थानिक राजकीय नेत्यांकडून मिळणारे सहाय्य आणि लांगुलचालन याकडे निर्देश करते. त्यामुळे देशभर बिहारच्या धर्तीवर मतदारयाद्यांची विशेष सखोल तपासणी करणे अत्यावश्यक आहे
सुदैवाने राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार सत्तेत आहे आणि अशा घुसखोर माफियांची कंबर तोडण्याची प्रामाणिक राजकीय इच्छाशक्ती त्यांच्याकडे निश्चितच आहे.
परंतु बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या घुसखोरीला प्रभावी आळा घालण्यासाठी कडक कायदे अस्तित्वात असणे अत्यंत गरजेचे आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या सरकारने प्रस्तावित केलेला एनआरसी कायदा या दृष्टीने महत्वाचा आहे.







