29.6 C
Mumbai
Friday, October 23, 2026
घरक्राईमनामाबलात्कार पीडितेची ओळख उघड केल्याप्रकरणी सौरभ भारद्वाज यांच्यावर एफआयआर

बलात्कार पीडितेची ओळख उघड केल्याप्रकरणी सौरभ भारद्वाज यांच्यावर एफआयआर

दिल्ली पोलिसांकडून कारवाई

Google News Follow

आम आदमी पक्षाचे (आप) दिल्ली प्रदेशाध्यक्ष सौरभ भारद्वाज यांच्या अडचणी वाढल्या आहेत. जनकपुरी परिसरातील एका बलात्कार पीडितेची ओळख उघड केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. माहितीनुसार, जनकपुरी येथील एका शाळेत तीन वर्षांच्या मुलीवर झालेल्या बलात्काराच्या प्रकरणात सौरभ भारद्वाज यांनी पीडितेची ओळख उघड केली. त्यानंतर त्यांच्या विरोधात एफआयआर नोंदविण्यात आला आहे. सध्या जनकपुरी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

गेल्या महिन्यात शाळेच्या परिसरात एका चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली होती. यावर प्रतिक्रिया देताना सौरभ भारद्वाज यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर लिहिले होते, “आज देशातील सर्वात कमी वयाची पीडित म्हणजे अवघ्या तीन वर्षांची मुलगी आहे. जनकपुरीतील एका शाळेत तिच्यावर बलात्कार झाला. आरोपी हा शाळेतील ५७ वर्षीय वरिष्ठ अधिकारी आहे.” या घटनेनंतर त्यांनी दिल्ली पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. सौरभ भारद्वाज यांच्या म्हणण्यानुसार, पीडितेच्या आईने आरोप केला होता की, स्थानिक एसएचओ आणि डीसीपी हे प्रकरण दडपण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकत आहेत.

हे ही वाचा:

सलमान खानने ‘काला हिरण’च्या निर्मात्यांना पाठवली कायदेशीर नोटीस

मान्सूनचे केरळ आगमन लांबले! काय आहे अंदाज?

लेबनॉनमधील वाढत्या संघर्षावरून ट्रम्प संतापले

भावूक झाला किंग कोहली!

आप नेत्यांनी असेही म्हटले होते की, पीडित मुलीच्या पालकांनी All India Institute of Medical Sciences (एम्स) येथे पुन्हा वैद्यकीय तपासणी करण्याची मागणी केली आहे; मात्र, पोलिस त्यासाठी तयार नाहीत. इतक्या लहान पीडितेला अद्याप न्याय मिळालेला नाही, असेही त्यांनी नमूद केले. ते म्हणाले, “तीन वर्षांच्या निष्पाप मुलीची एम्समध्ये वैद्यकीय तपासणी करण्यास पोलिस तयार का नाहीत? आरोपी आणि शाळेतील वरिष्ठ अधिकाऱ्याला कोण वाचवत आहे? या सरकारमध्ये प्रत्येक पीडितेला न्याय मिळण्यासाठी सोशल मीडियावर मोठा गदारोळ होणे आवश्यक आहे का?” या घटनेच्या निषेधार्थ आम आदमी पक्षाने गेल्या काही दिवसांत दिल्लीत आंदोलनही केले होते.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा