28 C
Mumbai
Sunday, September 20, 2026
घरक्राईमनामादहिहंडीच्या दोरामुळे भिंतीचा कॉलम कोसळून चिमुरड्याचा मृत्यू

दहिहंडीच्या दोरामुळे भिंतीचा कॉलम कोसळून चिमुरड्याचा मृत्यू

मुंबईत ३२ गोविंदा झाले जखमी

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

मालाड पश्चिमेतील चिकूवाडी परिसरात दहीहंडी फोडताना विटांचा कॉलम कोसळून सात वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. रुद्र कदम असे मृत मुलाचे नाव आहे. दहीहंडीचा दोर झाडाला आणि तळमजल्यावरील बांधकामाच्या विटांच्या कॉलमला बांधण्यात आला होता. हंडी फोडण्याच्या प्रयत्नादरम्यान हा कॉलम अचानक कोसळला आणि त्याखाली रुद्र दबला.

ही घटना दुपारी तीनच्या सुमारास मालाड पश्चिमेतील मार्वे रोडवरील चिकूवाडी येथील एकता वेल्फेअर सोसायटीतील रूम क्रमांक २३ जवळ घडली. स्थानिक मुलांकडून दहीहंडीचा उत्सव साजरा केला जात होता. हंडी फोडण्यासाठी बांधण्यात आलेला दोर झाडासह तळमजल्यावरील विटांच्या कॉलमला बांधण्यात आला होता. हंडी फोडताना अचानक विटांचा कॉलम कोसळला. त्यावेळी जवळ असलेल्या रुद्रच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

घटनेची माहिती मिळताच वॉर्ड नियंत्रण कक्षाकडून संबंधित यंत्रणांना कळविण्यात आले. वॉर्ड कर्मचारी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी रुद्रला तातडीने मालवणी जनरल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला तपासल्यानंतर ‘आणताना मृत’ घोषित केले.

हे ही वाचा:

हे मौन बोलकं आहे…

दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना कंगना रणौतने झापले!

मुंबई उच्च न्यायालयाचा ‘ओल्ड मॉन्क’च्या लेबलवर आक्षेप

‘इक्वल अर्थ’ नकाशाला १६४ देशांचा पाठिंबा

दरम्यान, मुंबईतील विविध सरकारी आणि महापालिका रुग्णालयांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दहीहंडी उत्सवादरम्यान शनिवारी दुपारी तीन वाजेपर्यंत एकूण ३२ गोविंदा जखमी झाल्याची नोंद झाली. त्यापैकी चार जणांवर रुग्णालयात उपचार सुरू असून २८ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. सेंट्रल ट्रॅक (CT) रुग्णालयांमध्ये २९ जखमींची नोंद झाली असून त्यापैकी चार जण उपचाराधीन आणि २५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

ईस्टर्न सबर्ब्स (ES) रुग्णालयांमध्ये दोन जखमींची नोंद झाली, तर वेस्टर्न सबर्ब्स (WS) रुग्णालयात एका गोविंदावर उपचार करण्यात आले. दहीहंडी उत्सवात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होत असताना, उत्सवाच्या ठिकाणी सुरक्षिततेची काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे, हे मालाडमधील या दुर्घटनेने अधोरेखित केले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
334,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा