29.9 C
Mumbai
Tuesday, October 27, 2026
घरक्राईमनामाभावाने केला बहिणीचा विनयभंग, पोलिसांनी मुसक्या आवळल्या

भावाने केला बहिणीचा विनयभंग, पोलिसांनी मुसक्या आवळल्या

भावाबहिणीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना

Google News Follow

बलात्काराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना आता कुर्ला येथे भावानेच बहिणीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे बहीण भावाच्या नात्यालाच काळीमा फासला गेला आहे. त्या बहिणीने नंतर आत्महत्याही केली आहे.

१४ वर्षीय अल्पवयीन बहिणीवर अत्याचार करून तिला आत्महत्या करण्यास भाग पाडणाऱ्या सख्ख्या मावस भावास विनोबा भावे मार्ग पोलिसांनी अटक केली आहे.

२१ वर्षीय आरोपी मागील अनेक दिवसांपासून मुलीवर अत्याचार करत असल्याने ती मुलगी मानसिक तणावाखाली वावरत होती. यातून तिने तिच्या बहिणीच्या लग्नादरम्यान आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र ती त्यावेळेस थोडक्यात बचावली. त्यानंतर तिच्यावरील तणाव वाढत गेला.

हे ही वाचा:

नाटू-नाटू, द एलिफन्ट व्हिस्परर्सने रचला इतिहास, भारताला मिळाले दोन ऑस्कर

शीतल म्हात्रे व्हीडिओप्रकरणी प्रकाश सुर्वेंच्या पुत्राकडून अब्रुनुकसानीचा गुन्हा

ऑस्कर विजेती ४० मिनिटांची डॉक्युमेंट्री द एलिफन्ट…बनली ४५० तासांच्या फूटेजमधून

दिलासा.. कांद्याला प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान

दरम्यान भावाच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने गळफास घेऊन काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली. मात्र पोलिस तपासा दरम्यान पीडित मुलीने लिहिलेली सुसाइड नोट पोलिसांच्या हाती लागली.

त्यात भावाने केलेल्या अत्याचाराबाबत सबळ पुरावे मिळाल्यानंतर पोलिसांनी भावावर कलम 354, 305 भा.द.वि. सह कलम 8,12,18 पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा