34 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
घरदेश दुनियाऑस्कर विजेती ४० मिनिटांची डॉक्युमेंट्री द एलिफन्ट...बनली ४५० तासांच्या फूटेजमधून

ऑस्कर विजेती ४० मिनिटांची डॉक्युमेंट्री द एलिफन्ट…बनली ४५० तासांच्या फूटेजमधून

हत्तीचे पिल्लू रघुची ही भावनिक कहाणी आणि त्याचे बोम्मन-बेलीशी असलेले नाते दाखविणारी फिल्म

Google News Follow

Related

‘द एलिफन्ट व्हिस्परर्स’ या शॉर्ट फिल्मला ऑस्कर पुरस्कार मिळाल्यानंतर त्याविषयीची चर्चा अर्थातच सुरू झाली आहे. कार्तिकी गोन्साल्विस यांनी ही फिल्म तयार केली आणि त्यांचे जीवन एकप्रकारे या शॉर्ट फिल्मशी जोडले गेले. त्यात हत्तीचे छोटे पिल्लू रघु याच्या कथेवर आधारित ही शॉर्ट फिल्म आहे.

२०१७मध्ये गोन्साल्विस प्रथम या रघुला भेटल्या आणि तिथून त्यांच्या मनात या फिल्मची निर्मिती रुंजी घालू लागली. गोन्साल्विस यांचे बालपण दक्षिण भारतात गेले. त्यांचे वडील छायाचित्रकार होते तर आईला प्राण्यांची आवड होती. व्हिज्युअल कम्युनिकेशन्समध्ये त्यांनी पदवी मिळविली आणि मग त्यांनी विशेषतः वन्यजीवांसंदर्भात हे छायाचित्रण करण्यास प्रारंभ केला. आपल्या गावी म्हणजे ऊटीमध्ये जाऊन आपली ही आवड जोपासण्याचा प्रयत्न करत असतानाच त्या मदुमलाई येथील टायगर रिझर्व्हमध्ये थांबल्या. तेव्हा त्यांची भेट रघुशी झाली. त्या रघुच्या प्रेमात पडल्या. तो त्याच्या अंगावर पाण्याचा फवारा उडवत असे आणि त्या रघुच्या जिभेला कुरवाळत. त्यालाही ते आवडत असे. मग तो गोन्साल्विस यांचे केस सोंडेने ओढत असे.

हे ही वाचा:

परदेशी आईचा मुलगा देशभक्त होऊ शकत नाही

नाटू-नाटू, द एलिफन्ट व्हिस्परर्सने रचला इतिहास, भारताला मिळाले दोन ऑस्कर

परदेशी आईचा मुलगा देशभक्त होऊ शकत नाही

विमानात सिगारेट पिणाऱ्या आणि दरवाजा उघडणाऱ्या प्रवाशाने घातला गोंधळ

रघुचा सांभाळ बोम्मन आणि बेली या जोडप्याने केला. त्याची ही कहाणी शॉर्टफिल्ममध्ये दाखविण्यात आली आहे.

रघु हत्तींच्या समुहापासून वेगळा झाला होता. त्याच्या आईला विजेचा झटका बसल्यानंतर तो हत्तींच्या समुहापासून दूर झाला. पाण्याच्या शोधात हे सगळे हत्ती गावाजवळ आले होते. तिथेच रघु त्या समुहापासून वेगळा झाला. वनविभागाला रघु अत्यंत वाईट अवस्थेत सापडला होता. त्याच्यावर कुत्र्यांनी हल्ला केला. त्यामुळे त्याला जखमा झाल्या होत्या. त्या जखमांमध्ये किडी झाल्या. अशा परिस्थितीत रघु बचावेल असे कुणालाही वाटले नव्हते. बेली आणि बोम्मन यांच्याकडे रघुला सोपविले. बेली ही कट्टुनायकन या आदिवासी जमातीतील एक महिला. तिच्या पहिल्या पतीला वाघाने मारले. तेव्हापासून वाघापासून तिला प्रचंड भय होते. ही जमात हत्तींचा सांभाळ करणारी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे वनविभागाने त्यांच्याकडे रघुला सोपविले. त्यातून मग बोम्मन आणि बेली यांनी रघुची काळजी घेतली. त्यावरच ही ४० मिनिटांची फिल्म बनली. पण त्यासाठी गोन्साल्विस यांनी तब्बल ४५० तासांचे फूटेज मिळविले आणि त्यावर पाच वर्षे मेहनत घेतली. या फिल्ममध्ये रघुची बोम्मन आणि बेली कशी काळजी घेतात. त्यातील आणखी एक छोटा बच्चा अम्मूचा ते कसा सांभाळ करतात हे दिसते.

लहान असताना त्यांचा साभाळ बोम्मन आणि बेली करतात पण नंतर तो थोडा मोठा झाल्यावर त्याचा सांभाळ करण्यासाठी त्याला अनुभवी लोकांकडे देण्याचा निर्णय वनविभाग करते. ती बाब बोम्मन आणि बेलीला मनाला खूप लागते. पण अम्मू अशा परिस्थितीत त्यांना साथ देतो. रघु आपल्यापासून दूर जातोय म्हटल्यावर बेलीच्या डोळ्यात अश्रु येतात तेव्हा अम्मू सोंडेने ते अश्रु पुसतो. पहाटे दूध आणायला जाणाऱ्या बोम्मनला अम्मू आपल्या सोंडेने जवळ ओढतो. असे काही भावनिक क्षण या फिल्ममध्ये दिसतात. या फिल्मसाठी कोणतीही स्क्रिप्ट नाही तर जे काही तत्क्षणी घडते ते रेकॉर्ड करण्यात आले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा