23 C
Mumbai
Tuesday, March 21, 2023
घरराजकारणपरदेशी आईचा मुलगा देशभक्त होऊ शकत नाही

परदेशी आईचा मुलगा देशभक्त होऊ शकत नाही

Google News Follow

Related

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी लंडन दौऱ्यात मोदी सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली होती. संसदेत माईक बंद ठेवला जातो बोलू दिले जात नाही असाही आरोप राहुल गांधी यांनी केला होता. त्यानंतर भाजपकडून राहुल गांधींवर सातत्याने हल्लाबोल केला जात आहे. आता भोपाळच्या लोकसभा सदस्य साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनीही राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. परदेशी आईचा मुलगा कधीही देशभक्त होऊ शकत नाही अशी गंभीर टीका साध्वी ठाकूर यांनी केली आहे.

तुम्हाला जनतेने निवडून दिले असून तुम्ही जनतेचा आणि देशाचा अपमान करत आहात, अशा शब्दात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर राहुल गांधी यांना सुनावले आहे . तुमची आई इटलीची असल्याने तुम्ही भारतातील नाहीस असे आम्ही गृहित धरले आहे. परदेशी स्त्रीच्या पोटी जन्मलेला मुलगा कधीच देशभक्त होऊ शकत नाही, असे आपण नाही तर चाणक्याने म्हटले आहे अशी खोचक टीका साध्वी ठाकूर यांनी केली.

राहुल गांधी यांच्याववर निशाणा साधताना साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या इतकी वर्षे काँग्रेस सरकारने देश पोकळ करून ठेवला. आता राहुल गांधी परदेशात जाऊन सांगत आहेत की आम्हाला संसदेत बोलू दिले जात नाही. यापेक्षा लज्जास्पद काहीही असू शकत नाही.  अशा राहुल गांधींचा मी निषेध करते.

हे ही वाचा:

अमेरिकेत ‘भारतीयांना’ आता सहज ‘व्हिसा’ मिळणार

१२ मार्च १९९३… ३० वर्षांनंतर मोदींनी चव्हाट्यावर आणला व्होरा समितीचा अहवाल….

धावत्या रिक्षावर १७व्या मजल्यावरून पडला लोखंडी रॉड आणि…

‘त्या’ जोडप्याचा भांग पिऊन बाथरुममध्ये झाला मृत्यू

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना साध्वी ठाकूर म्हणाल्या, आता हे आपल्या देशात कशा प्रकारचे राजकारण करत आहेत, यावर प्रश्न उपस्थित केला पाहिजे. त्यांना राजकारणाची संधी मिळू नये आणि राजकारणातून बाहेर फेकले पाहिजे. संसदेतील कामकाज चांगले सुरू आहे. सर्व काही ठीक आहे, पण काँग्रेस सभागृह चालू देत नाहीत. संसद चालू राहिली तर लोकांची कामे होतील आणि लोकांची कामे झंझाली तर आपले अस्तित्व संपेल अशी बीटी काँग्रेसला वाटत आहे काँग्रेसचे अस्तित्व संपण्याच्या मार्गावर आहे, पण आता काँग्रेसची बुद्धीही भ्रष्ट होत आहे अशी खोचक टीका साध्वी यांनी केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,884चाहतेआवड दर्शवा
2,019अनुयायीअनुकरण करा
65,100सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा