34 C
Mumbai
Saturday, June 3, 2023
घरदेश दुनियानाटू-नाटू, द एलिफन्ट व्हिस्परर्सने रचला इतिहास, भारताला मिळाले दोन ऑस्कर

नाटू-नाटू, द एलिफन्ट व्हिस्परर्सने रचला इतिहास, भारताला मिळाले दोन ऑस्कर

जगभरात भारतीय चित्रपटसृष्टीचे, कलात्मकतेचे कौतुक

Google News Follow

Related

भारतीयांच्या आणि भारतीय चित्रपटसृष्टीच्या दृष्टीने अत्यंत अभिमानास्पद घटना घडली ती म्हणजे सर्वाधिक प्रतिष्ठेच्या ऑस्कर पुरस्कारासाठी आरआरआर या चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याला बेस्ट ओरिजिनल स्कोअर हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले तर त्याचवेळी भारताला आणखी एक आनंदाची बातमी मिळाली ती म्हणजे द एलिफन्ट व्हिस्परर्स या शॉर्ट फिल्मसाठीही भारताला ऑस्कर पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यामुळे भारताला एकाच ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात दोन पुरस्कार मिळाल्याचा हा इतिहास घडला. याआधी, भारताने एक ऑस्कर पुरस्कार भारताला मिळाला होता तो ए.आर रेहमान यांच्या द स्लम डॉग मिलेनियर या चित्रपटातील ‘जय हो’ या गाण्याला. त्यामुळे आता मिळालेल्या या दोन पुरस्कारांना एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.

एस.एस. राजमौली यांच्या आरआरआर या चित्रपटाची चर्चा होतीच पण जेव्हा नाटू नाटू हे गाणे ऑस्करला गेले आणि नामांकन मिळाले तेव्हाही सर्वांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या.

हे ही वाचा:

‘मेघदूता’ वरील सुहास लिमये यांचे पुस्तक प्रकाशित

अंधारेबाईंचं सोयीचं संविधान

का साजरी करतात ‘एकनाथ षष्ठी’ ..जाणून घ्या

विमानात सिगारेट पिणाऱ्या आणि दरवाजा उघडणाऱ्या प्रवाशाने घातला गोंधळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पुरस्काराबद्दल दोन्ही यशस्वी टीमचे कौतुक केले आहे. नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, नाटू नाटू या गाण्याने जगभर लोकप्रियता मिळविली आहे. येणाऱ्या अनेक वर्षात हे गाणे सगळ्यांच्या स्मरणात राहणार आहे. एमएमकिरावाणी, बोस यांचे अभिनंदनही पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.

द एलिफन्ट व्हीस्परर्स या शॉर्ट फिल्मच्या टीमचेही पंतप्रधानानांनी कौतुक केले आहे. अर्थस्पेक्ट्रम आणि गुणितएम यांच्यासह सगळ्या टीमचे खूप खूप अभिनंदन असे पंतप्रधांनांनी आपल्या ट्विटरवर लिहिले आहे. निसर्गासोबत राहात असताना आपण त्याच्यासोबत वाटचाल केली पाहिजे आणि त्याचसोबत विकासही साधला पाहिजे हा संदेश ही फिल्म देते असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,851चाहतेआवड दर्शवा
2,022अनुयायीअनुकरण करा
76,300सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा