33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरधर्म संस्कृती'मेघदूता' वरील सुहास लिमये यांचे पुस्तक प्रकाशित

‘मेघदूता’ वरील सुहास लिमये यांचे पुस्तक प्रकाशित

अभ्यासपूर्ण व्याख्यानांचे संपादन मंडळाने केले संपादन

Google News Follow

Related

स्वर्गीय सुहास लिमये यांच्या व्याख्यानांवर आधारित ‘मेघदूत पूर्वमेघ एक विवेचक अभ्यास’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला आहे. लिमये सरांनी अत्यंत मेहनतीने तयार करून अभ्यासपूर्ण व्याख्यानाचे संपादन मंडळाने केलेले संपादन असून या प्रकाशन समारंभासाठी संस्कृत प्रगत अध्ययन केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ इथे संशोधन शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या प्रा. डॉ. निर्मला कुलकर्णी या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्त्या म्हणून लाभल्या होत्या. जिज्ञासा अभ्यास मंडळाच्या वतीने पाणिनीय व्याकरण प्रवेशासाठी सुलभ ठरणारे ‘अष्टाध्यायी प्रवेश ‘हे पुस्तक शिकवत असलेल्या डॉ. लीना दोशी यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन पार पडले.

आपल्या भाषणात प्रा. निर्मला कुलकर्णी यांनी कालिदासाची काव्य वैशिष्ट्ये आणि मेघदूत या अजरामर काव्याचा प्रेरणा स्रोतांचा अभ्यासपूर्ण आढावा घेत त्यांनी कालिदासाने मेघदूत लिहून संदेशकाव्याचा एक काव्यप्रकाराच संस्कृत साहित्यात निर्माण केला. असे सांगितले. या पुस्तकाच्या रूपाने लिमये सर घराघरात पोचतील आणि अनेकांना प्राचीन संस्कृत वाङ्मय वाचण्याची आणि संस्कृत शिकण्याची प्रेरणा देतील असा आशावाद यावेळी व्यक्त केला.  लिमये सरानी विद्यार्थ्यांना शिकवताना काय, कशी, आणि किती तयारी करावी याचा वस्तुपाठच लिमये सरांनी घालून दिल्याचे डॉ. लीना दोशी यांनी सांगत कोरे कागद, अनेक कोश, पुस्तकांचे ढिगारे यांच्या गराड्यात बसून आठ-आठ, दहा-दहा तास एकेका श्लोकाची तयारी करणाऱ्या लिमये सरांचे एक चित्रच श्रोत्यांपुढे हुबेहूब उभे केले.

हे ही वाचा:

दाऊदचा मुलगा दुबईत पार्टीला आला होता?

राज्यातील शेतकऱ्यांना १२ तास वीज देणार

जेष्ठ नाट्य समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचे निधन

माधुरी दीक्षित यांच्या आईचे वृद्धापकाळाने निधन

कालिदासाने उज्जयिनी नगरीचा उल्लेख ‘कांतिमत खंडम’ म्हणजेच स्वर्गाचा एक प्रकाशमान तुकडा असा केला आहे. मेघदूतावरील भाषांतरे , टीका, समश्लोकी अशा अनेक पुस्तकांमध्ये लिमये सरांचे हे पुस्तक म्हणजे कान्तिमत खंडच ठरणार असल्याचे डॉ. लीना दोशी यांनी यावेळेस काढले. ग्रंथालीचे विश्वस्त श्री. सुदेश हिंगलासपूरकर यांनी लिमये सरांच्या आठवणींबरोबरच ग्रंथालीच्या कार्याची माहिती दिली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मोहन हर्षे यांनी केले आहे. या कार्यक्रमाला सरांचे विद्यार्थी, मित्रपरिवार, आणि सर्व संस्कृत प्रेमी अभ्यासक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
पुस्तकाच्या अधिक माहितीसाठी भारती लिमये यांच्याशी ९९६७०७०५९३ या क्रमांकावर संपर्क साधावा.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा