28 C
Mumbai
Saturday, March 25, 2023
घरविशेषदाऊदचा मुलगा दुबईत पार्टीला आला होता?

दाऊदचा मुलगा दुबईत पार्टीला आला होता?

सतीश कौशिक यांचा मित्र विकास मालूंच्या पत्नीचा दावा

Google News Follow

Related

प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या निधनाला आठवडाही झालेला नाही. त्यातच त्यांचा मित्र विकास मालूची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सतीश कौशिक यांची तब्येत बिघडली तेव्हा ते कुबेर ग्रुपचे मालक विकास मालू यांच्या फार्महाऊसवर होते. आता विकास मालूच्या दुसऱ्या पत्नीने दिल्ली पोलिसांना एक खळबळजनक पत्र लिहिले आहे.

या महिलेने पोलिस आयुक्तांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, २३ ऑगस्ट २०२२ रोजी तिचा पती विकास मालू दुबईत पार्टी करत होते. या पार्टीला अभिनेता सतीश कौशिकही उपस्थित होते. विकासनेच मला सांगितले की, दाऊद इब्राहिमचा मुलगा अनस देखील या पार्टीत उपस्थित होता. या पार्टीपूर्वी सतीश कौशिक विकास मालू यांच्या घरी गेले होते आणि १५ कोटी रुपयांवरून वादही झाला होता.

हेही वाचा :

चीनमध्ये गाड्यांवर पावसातून पडला किडींचा ढीग?

राज्यातील शेतकऱ्यांना १२ तास वीज देणार

माधुरी दीक्षित यांच्या आईचे वृद्धापकाळाने निधन

सतीश कौशिक मृत्यू प्रकरणात विकास मालूच्या दुसऱ्या पत्नीच्या आरोपांना आता नवे वळण लागले आहे. मालूच्या पत्नीने केलेल्या आरोपांची दिल्ली पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केली आहे.

विकास मालू यांच्यावर पत्नीने कोणते आरोप केले आहेत?

  • तक्रारीनुसार, विकास आणि सतीश यांच्यात १५ कोटी रुपयांच्या कर्जावरून भांडण झाले होते. विकासच्या दुसऱ्या पत्नीने असे आरोप केले आहेत की, पैसे थकवण्यासाठी विकासने सतीश कौशीक यांना चुकीचे औषध दिले असावे.
  • या प्रकरणाचा दुसरा पैलू म्हणजे दुसऱ्या पत्नीनेही दोन महिन्यांपूर्वी विकास मालूविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, या प्रकरणात विकासला अद्यापबही अटक करण्यात आलेले नाही.
  • या प्रकरणानंतर विकास मालू दुबईत वास्तव्यासाठी गेला. होळी पार्टीसाठी खासकरून दिल्लीत आला होता. यावर विकास मालूने आपल्यावरील झालेल्या रोपांबाबत इन्स्टाग्रामवर स्पष्टीकरण दिलेले आहे.
  • विकास मालूने लिहिले आहे की, सतीशजी ३० वर्षे माझ्या कुटुंबाचा भाग होते आणि जगाला माझं नाव चुकीच्या पद्धतीने समोर आणण्यात एक मिनिटही लागला नाही. मला सांगायचे आहे की समस्या कधीही सांगून येत नाहीत. या धक्क्यातून मी अजून सावरलेलो नाही.
  • सतीश कौशिक यांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे स्पष्ट केले आहे.  शवविच्छेदन अहवालातही कोणताही संशय व्यक्त करण्यात आलेला नाही आणि कुटुंबियांकडून कोणताही कट रचल्याचा संशय व्यक्त करण्यात आलेला नाही.

मात्र होळी पार्टीनंतर सतीश कौशिक यांच्या अकाली निधनाने बॉलिवूडसह त्यांच्या लाखो चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. आता त्यांच्या मृत्यूप्रकरणी या नव्या आरोपांचे सत्य काय? पोलिस तपासात या प्रश्नांची उत्तरे समोर येणे अपेक्षित आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,880चाहतेआवड दर्शवा
2,037अनुयायीअनुकरण करा
65,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा